एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा, मनसेची राज्यपालांकडे मागणी
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. यासंदर्भात विविध मागण्या मांडण्यासाठी मनसेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट गेतली.
मुंबई : शेतकरीप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट गेतली. महाराष्ट्रात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप व्हावे, अशी मागणी मनसे नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. यावेळी आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे, अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.
राज्यपालांसोबतच्या भेटीनंतर आमदार राजू पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. त्यामुळे राज्यपाल या राज्याचे पालक आहेत. राज्यासमोर सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांपर्यंत तातडीने मदत पोहोचवा, अशी मागणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली"
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. यावर्षी राज्यातला शेतकरी सुरुवातीला दुष्काळाशी झगडत होता. त्यानंतर मुसळधार पाऊस, सातारा, सांगली कोल्हापुरात आलेला महापूर, त्यानंतरचा अवकाळी पाऊस अशा अनेक अडचणींना शेतकरी तोंड देत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी, या मागणीसाठी आतापर्यंत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्रात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदतीचं वाटप व्हावं ह्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोशारी जी ह्यांची भेट घेतली. त्यावेळची काही क्षणचित्रं. pic.twitter.com/gxGx4vdfjK
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) November 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement