एक्स्प्लोर
पुण्यात मनसेला जोरदार धक्का, नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
मुंबईः पुण्यात मनसे आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मनसे आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातील नगरसेवक, कार्यकर्त्यांनी 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजेंद्र बऱ्हाटे (मनसे आजी नगरसेवक, कर्वेनगर), राजाभाऊ गोराडे (मनसे माजी नगरसेवक) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीकडून दिनेश ऊर्फ पिंटू धाडवे (राष्ट्रवादी आजी नगरसेवक, बिबवेवाडी) यांनीही भाजपचा रस्ता धरला आहे.
मनसे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत अन्य कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement