एक्स्प्लोर
Advertisement
शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार : सुरेश धस
उस्मानाबाद-बीड-लातूर या जागेसाठी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शंभर ते दीडशे मतांच्या अंतराने निवडून येऊ, असा दावा भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केला.
बीड : उस्मानाबाद-बीड-लातूर या जागेसाठी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शंभर ते दीडशे मतांच्या अंतराने निवडून येऊ, असा दावा भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केला. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यांमध्ये भाजपला चांगलं मतदान होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्त मतदान पद्धतीचं उल्लंघन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या हातात घड्याळ घातले, काहींना किचन दिलं, तर काहींच्या शर्टवर चिप्स लावले, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा यामध्ये समावेश आहे.
या निवडणुकीत महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपरिषदेचे सदस्य, नगरपंचायतीचे सदस्य मतदान करतात.
बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये?
बीड-लातूर-उस्मानाबाद लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला. या तीन जिह्ल्यात मिळून एकूण 1006 मतदार आहेत. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार आहेत. त्यामुळे भाजप मतांचं गणित कसं जुळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकूण 1006 मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 527 शिवसेना - 64 भाजप - 321 अपक्ष - 94 संबंधित बातम्या : कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे! विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा तिसरा उमेदवारही जाहीर सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement