(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरभक्षक बिबट्याने करमाळ्याच्या सांगवी भागात केला हल्ल्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांनी दिली घटनास्थळी भेट
कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आज सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
सोलापूर : करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याने आज दुपारी बाराच्या सुमारास नरसोबावाडी सांगवीजवळ भागात शेतात काम करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पत्नीवर झडप मारली. यावेळी त्यांनी बिबट्याची झडप चुकवली यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दगडाचा भडीमार संबंधित नरभक्षक बिबट्या व केल्यानंतर तो बिबट्या तिथून पळून गेला.
पळून गेल्यानंतर तो बिबट्या रामचंद्र महादेव कदम यांच्या उसाच्या शेतात गेला दुपारी दीड वाजल्यानंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना कळाली. वन विभागाच्या 70-80 कर्मचाऱ्यांनी या या उसाच्या पाच एकराच्या फडाला घेराव घातला असून शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले आहेत. रात्री 9 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले पण त्यांना यश आले नाही.
दरम्यान जामखेडाचे आमदार रोहित पवार यांनी आज सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत बिबट्याचे संकट करमाळा तालुक्यावरून टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना दिल्या. यावेळी रोहित पवार व त्यांचे सहकाऱ्यांनी हातात काठ्या घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली . त्यांच्यासोबत बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गवळी उपस्थित होते.
बिबट्या असलेल्या जागी कशी घ्याल काळजी?- शेतात जातांना एकटं दुकटं जावू नये समूहाने जावे.
- हातात काठी ठेवावी, जोरानं आवाज करत जावे.
- काठीला घुंगरू बांधावेत, मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणी लावावी.
- बसून खुरपणीची कामं करताना, काळजी घ्यावी.
- गळ्याला मोठं जाड कापड बांधावे, बिबट्या खास करून गळ्यावर हल्ला करतो.
- रात्रीच्या वेळी शेतात, बिबट्याच्या क्षेत्रात जाणे टाळावे
राज्यात या वर्षी बिबट्यांचा लोकवस्तीतळावर वावर वाढला आहे.या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांनी आपला जीव गमावला, तर 159 बिबट्यांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्यातील शेतकऱ्यांची बिबट्याच्या भितीनं झोप उडाली आहे.
Karmala Leopard | 12 जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या 4 दिवसांपासून मोकाट
संबंधित बातम्या :