शरद पवार अजित पवार एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर... नेमकं काय म्हणाले मुश्रीफ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मला खूप आनंद होईल, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी केलं. शरद पवार गट आण अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मला खूप आनंद होईल, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी केलं. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, कदाचित राष्ट्रवादी एकत्र आली असेल, यावर बोलताना मुश्रीफांनी राऊतांना टोला लगावला. शरद पवारांनी (Sharad Pawar) याबाबत संजय राऊतांना सांगितलं असेल असं मुश्रीफ म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण गेल्या काही दिवसात विविध कार्यक्रमाच्या आणि बैठकांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो : अजित पवार
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटत असल्याचे दिसत आहे. त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तसंच काहीसं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले. पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.
सोमवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे येथे एक बैठक झाली आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये साखर उद्योगाविषयी चर्चा झाली आहे. ऊस शेती आणि साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमता (AI) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर चर्चा झाली. या बैठकीनंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांना या भेटीविषयी विचारले असता, कामाच्या निमित्ताने अशा भेटी होत असतात असे उत्तर त्यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar : शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो पण..., अजित पवार नेमकं काय म्हणाले?
























