एक्स्प्लोर

Ajit Pawar : शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो पण..., अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

Ajit Pawar Speech : कुणीही तळ्यात मळ्यात करू नका, तळ्यात मळ्यात न करणारे अण्णा बनसोडे आज कुठे पोहोचले बघा असं अजित पवार म्हणाले. 

पुणे : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात, त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तसंच काहीसं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले. पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. 

काय म्हणाले अजित पवार? 

अजित पवार म्हणाले की, आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला. 

अचानक अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्यानं जगातल्या अनेक देशांत याचा परिणाम जाणवत आहे. कोरोनानंतर हे एक नवं संकट आलेलं आहे. त्याचा आपल्याला सामना करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशात चांगले संबंध जोडलेले आहेतच, याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल असं अजित पवार म्हणाले.

तळ्यात मळ्यात करु नका

आम्ही निर्णय घेतला तरी काहीजणांचे तळ्यात मळ्यात सुरू होतं असं अजित पवार म्हणाले. तसं करु नका, तळ्यात मळ्यात न राहता अण्णा कुठे गेला बघा असं अजित पवार म्हणाले. 

भान ठेऊन वागा आणि बोला

पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास आहे. या प्रवासात बनसोडेंनी बरेच चढ उतार पाहिले. यावर मात करत सामान्य कुटुंबातून आलेले अण्णा या पदावर पोहचलेत असं अजित पवार म्हणाले. 

विधानसभेत काम करत असताना आता भान ठेऊन वागा आणि बोला असा सल्ला अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना दिला. ते म्हणाले की, "आता तुमच्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. तुमचं वागणं, बोलणं याकडे सगळेच लक्ष ठेवणार. तुमच्या चिरंजीवांनाही काही गोष्टी सांगा. आपण मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या घरातीलच नातेवाईक काहीतरी वागला तर आपलीच बदनामी होते. त्यामुळे भान ठेऊन काम करा."

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवा. कोयता गँग, अमुक गँग, तमुक गँग हे चालणार नाही असा सज्जद दम यावेळी अजित पवारांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Sanjay Raut :
"अमित शाहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे"; 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊतांचा संताप

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Embed widget