एक्स्प्लोर

MHADA : नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 5 लाखांमध्ये घर घ्या, म्हाडाची लॉटरी जाहीर; जाणून घ्या 'स्वप्नातील घरां'च्या किमती

MHADA Lottery : म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये फक्त 5 लाखांपासून घरे उपलब्ध करुन दिली आहेत. त्यासाठी 11 ऑगस्ट पूर्वी अर्ज करावा लागणार आहे. 

मुंबई : आपल्या हक्काचं घर असावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र या महागाईच्या काळात शहरांमध्ये घर घेणं अनेकांना परवडत नाही. अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाने नाशिक आणि संभाजीनगर विभागासाठी लॉटरी जाहीर केली आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी केवळ 5 लाख किमतीपासून घरे उपलब्ध केली जाणार आहेत. 

म्हाडाच्या या घरांसाठी 30 जून रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठीची शेवटची तारीख ही 11 ऑगस्ट आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. 

Nashik MHADA Lottery : नाशिक विभागात घरांची किंमत किती? 

नाशिकमध्ये एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी 12.68 लाख ते 13.55 लाख इतक्या किमतीत घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. वडाळा शिवारमधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी ही घरे उपलब्ध असणार आहेत. 

तसेच अडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमध्येही अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याची किंमत ही 11.94 लाख ते 15.31 लाख इतकी असणार आहे. 

अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको, सावेदी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या घरांची किमत ही फक्त 5.48 लाख इतकी असणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar MHADA Lottery : छत्रपती संभाजीनगरमध्ये किती किंमत?

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवाज योजनेच्या अंतर्गत घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्या अंतर्गत नक्षत्रवाडीमध्ये 1056 घरे असून त्याची किंमत ही 15.30 लाख रुपये इतकी आहे. 

चिखलठाणामध्ये 158 घरे असून त्याची किंमत 27 लाख रुपये इतकी आहे. 

देवळाई या ठिकाणी 14 घरे असून त्याची किंमत ही 13.19 लाख ते 16.19 लाख इतकी आहे.

आनंद पार्कमध्ये 18 घरे असून त्याची किंमत 4.85 ते 6.27 लाख इतकी आहे. 

चिखलठाणा या ठिकाणी 6 घरे असून त्याची किंमत ही 34 लाख इतकी आहे. 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये 92 घरे असून त्याची किंमत ही 10.65 लाख रुपये इतकी आहे. 

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1 हजार 148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 164 सदनिका,20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 39 सदनिका/भूखंडांचा समावेश आहे. 

नाशिक मंडळातील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 63 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 04 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 1148 सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता 266 सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता 04 सदनिकांचा समावेश आहे.

MHADA Lottery Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?

म्हाडाच्या घरांच्या अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ 30 जूनला करण्यात आला. या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑगस्ट 2025 आहे. तसेच 12 ऑगस्टपर्यंत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 

यानंतर 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 25 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम पात्र यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे हक्काचे घर घेऊ इच्छिणार्‍या अर्जदारांना ही सुवर्णसंधी आहे. 

म्हाडाचे आवाहन

नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस  मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही. हक्काचे घर घेऊ इच्छिनार्‍या अर्जदारांना ही सुवर्णसंधी असून अधिकाधिक नागरिकांनी या सोडतीत सहभाग घ्यावा.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget