एक्स्प्लोर

MHADA : म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर! आता संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन

MHADA : म्हाडाच्या राज्यभरातील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे.

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) घरांची सोडत आणि ताबा प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत यापुढे हस्तक्षेप होणार नाही. म्हाडाच्या घरांची व्रिक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले आहेत.  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आलीय. 
  
म्हाडाच्या राज्यभरातील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया हाताळली जाणार आहे. स्वयंचलित ब्लॉकचेन प्रणालीमध्ये नागरिकांकडून डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आलेली माहिती आणि कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. तसेच ही प्रणाली वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होणार आहे. नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. या प्रक्रियेत नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारास एक युनिक क्रमांक प्राप्त होणार आहे. या नंबरच्या याआधारे अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. या प्रणालीमुळे अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी होणार आहे. 

नवीन प्रणालीमध्ये नोंदणीकरण प्रक्रियेदरम्यान म्हाडाने चेकलिस्टनुसार निर्धारित केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार म्हाडाच्या सदनिका विक्री सोडत प्रक्रियेतील पात्र उमेदवार ठरतील. अशाप्रकारे अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील. आधीच्या पद्धतीनुसार पात्रता निश्चिसाठी 21 कागदपत्रे विजेत्या अर्जदारांकडून मागविण्यात येत होती. मात्र, नवीन प्रणाली अंतर्गत केवळ 7 प्रकारची कागदपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. यामधील शपथपत्र, स्वयंघोषणापत्र तसेच स्वीकृतीपत्र यांची निर्मिती संगणकीय प्रणालीद्वारेच केली जाईल आणि अर्जदाराच्या आधार इ-सिग्नेचर द्वारे त्यावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. हा IHLMS 2.0 प्रणाली शासनाच्या विविध डेटाबेस सोबत जोडली जातील ज्यामध्ये डिजिलॉकर , महा-ऑनलाईन , इनकम टॅक्स, आधार, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच पीएमएवाय यांच्या एपीआयचा वापर करून अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने त्वरित करण्यात येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतर सोडतीतील विजेत्यांना देकार पत्र देखील ऑनलाईन प्राप्त होणार आहे. तसेच अर्जदार आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये झालेल्या बदलांची नोंद सोडत प्रक्रियेतील प्रोफाईलमध्ये कधीही करता येणार आहे.

नवीन आलेल्या प्रणालीत अर्जदारांनी त्यांचे प्रोफाईल वेळोवेळी अद्ययावत ठेवणे आवश्य असणार आहे. त्यामुळे भविष्यात केव्हाही म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर सोडत प्रणालीने पात्र ठरलेले अर्जदार इच्छुक घरासाठी अनामत रक्कमेचा भरणा करून सोडतीत सहभाग घेऊ शकतील. तसेच सोडतीत सदनिका प्राप्त झालेल्या यशस्वी अर्जदारांची माहिती देखील या प्रणालीत जतन केली जाणार आहे. अशा अर्जदारांनी नव्याने सोडत प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा अर्ज प्रणालीतून रद्द होऊन त्यांना तात्काळ याबाबतची माहिती संबंधितांना भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे दिली जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Embed widget