एक्स्प्लोर

MHADA : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर म्हाडाच्या 8,984 सदनिकांची सोडत होणार; अर्ज प्रक्रियेस प्रारंभ 

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर MHADA कोकण मंडळाच्या  8,984 सदनिकांची सोडत होणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

मुंबई : कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत 8 हजार 984 सदनिकांच्या विक्री करिता ऑनलाईन सोडत होणार आहे. त्यासाठीच्या अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मंगळवारी 'गो-लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याकरिता सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत 14 ऑक्टोबर, 2021 रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये  काढण्यात येणार आहे. 

यावेळी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना व प्रणाली या माहिती पुस्तिकेत समाविष्ट आहेत. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर  इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करणे आवश्यक राहील.    

मंगळवार 24 ऑगस्ट पासून सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्ज नोंदणीची सुरवात झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहिल. अर्ज नोंदणीची प्रक्रिया 22 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ 23 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अनामत रक्कमेच्या ऑनलाईन स्विकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ 24 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा 24 सप्टेंबर, 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना  करता येणार आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत 6 हजार 180 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 624 सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 586 सदनिका, सर्व्हे क्रमांक 162 खोणी  (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 2016 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथे 1769 सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे 1185 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.  
            
तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) 15 सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील 1 हजार 742 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथील 88 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे 36 सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 2 सदनिका, सर्व्हे क्रमांक 216 पीटी, 221 पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे 196 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक 491, 23 पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 1 सदनिका सोडतीत आहे.   
        
याशिवाय 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे 8, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे 76 सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे 23 सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) 16 सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे 2 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे 16 सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे 116 सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे 1 सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे 35 सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे 28 सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे 140 सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे 21 सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे 24 सदनिका, अगासन-ठाणे येथे 47 सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे)   येथे 62 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 11 येथे 40 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 8 येथे 51 सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे 68 सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे 20 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  
            
कोकण मंडळाच्या सन 2021 च्या सोडतीतील  इच्छुक अर्जदारांचे  अर्ज सादर करतेवेळी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या 12 महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25 हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25,001 हजार रुपये ते 50 हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,001 रुपये ते 75 हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.  
         
त्याचबरोबर अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत 5 हजार रुपये इतकी अनामत रक्कम भरावयाची आहे. तसेच अल्प उत्पन्न गटाकरीता 10 हजार रुपये, तर  मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला 15 हजार रुपये व उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत 20 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता 560 रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.          
         
कोकण मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छूक अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करणे आवश्यक राहील.    
         
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडे पारदर्शक संगणकीय सोडतीची एकमेव प्रक्रिया आहे. याव्यतिरिक्त म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. सोडत प्रक्रियेबाबत अथवा सदनिका मिळणेबाबत अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास कोकण मंडळ कोणत्याही फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी केले आहे. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्याकरिता आणि संगणकीय सोडत प्रणालीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याकरिता सन 2009 पासून उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे. कोकण मंडळाच्या 2021 च्या सोडतीसाठी देखील त्रिसदस्यीय उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget