(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Corona Updates : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासात 37 हजार रुग्णांची भर तर 648 जणांचा मृत्यू
India Corona Updates : देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.34 आहे तर रिकव्हरी दर हा 97.68 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.98 टक्के इतकी आहे.
India Corona Updates : गेल्या चार दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या 25 हजारांच्या आसपास स्थिर राहिल्यानंतर आता त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशामध्ये कोरोनाच्या 37,593 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 648 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशातील 34,169 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 25 हजार 467 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 354 जणांचा मृत्यू झाला होता.
देशातील सध्याची कोरोनास्थिती :
- कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 25 लाख 12 हजार 366
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 17 लाख 54 हजार 281
- सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 22 हजार 327
- एकूण मृत्यू : चार लाख 35 हजार 758
- एकूण लसीकरण : 59 कोटी 55 लाख 4 हजार
देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.34 आहे तर रिकव्हरी दर हा 97.68 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.98 टक्के इतकी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात मंगळवारी 4,355 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 43 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे.
राज्यात मंगळवारी 119 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 752 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11,962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (37), नंदूरबार (1), जालना (85), परभणी (19), धुळे (21), परभणी (14), हिंगोली (19), नांदेड (36), अमरावती (91), अकोला (17), वाशिम (10), बुलढाणा (27), यवतमाळ (02), नागपूर (93), वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (22) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
संबंधित बातम्या :
- Covid 22 : नवीन सुपर व्हेरिएंट 'कोविड 22' हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा
- Coronavirus Vaccine News: देशातील पहिली mRNA बेस्ड वॅक्सिन सुरक्षित, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी DCGI ची मंजुरी
- Covid Vaccine : देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक