Mask Price | मास्क दरावर अखेर नियंत्रण, मास्कचे नवे दर 3 रुपये ते 127 रुपये
उत्पादकाची उत्पाद किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य प्रस्तावित केल्याचे अहवालात नमूद केले आहे.
मुंबई : कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. केंद्र शासनाच्या किमतीवरील नियंत्रणही 30 जून 2020 नंतर संपुष्टात आलं होतं. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर यांच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं निदर्शनात आलं होतं. त्याचा भूर्दंड सामान्यांना सोसावा लागत होता. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने एका समितीची स्थापना केली होती. आता राज्यात मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.
या समितीने मास्क उत्पादक कंपन्यांचा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमत निश्चित केल्या आहेत. यावरून उत्पादकाची उत्पाद किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य प्रस्तावित केल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार राज्यात मास्कची (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मास्कच्या किमती
- N-95 V shape मास्क - 19 रुपये
- N-95 3D मास्क - 25 रुपये
- N-95 without valve मास्क- 28 रुपये
- Magnum N-95 MH cup मास्क - 49 रुपये
- CN95+ N-95 cup shape मास्क विना व्हॉल्व - 29 रुपये
- 713W-N-95-6WE cup style मास्क विना व्हॉल्वe - 37 रुपये
- 723W-N-95-6RE cup style मास्क विना व्हॉल्व- 29 रुपये
- FFP2 मास्क : ISI सर्टिफाईड - 12 रुपये
- 2 Ply surgical with loop or tie मास्क - 3 रुपये
- 3 Ply surgical with Melt Blown मास्क - 4 रुपये
- Doctors kit of 5 N-95 masks + 5 3Ply melt blown मास्क- 127 रुपये