एक्स्प्लोर

Maratha Reservation : वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंची मागणी

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रश्नच नाही, आता आरक्षण हे राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या माध्यमातून मिळू शकेल असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

अहमदनगर :  मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही ते ठरवावं. या प्रकरणातील राज्याची भूमिका संपली असून केंद्राने आता 102 व्या घटनादुरुस्तीसंबंधी वटहुकूम काढावा आणि घटनादुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्यावेत अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. मराठा आरक्षणासंबंधी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

मुक आंदोलन तात्पुरतं स्थगित
शासकीय बाबींना वेळ लागतोय म्हणून राज्य सरकारला वेळ दिलाय. त्यामुळे मराठा आरक्षणासंबंधी सुरु झालेलं मुक आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे, ते पूर्णपणे बंद केलं नाही असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. गायकवाड अहवालात ज्या त्रुटी आहेत त्या भरुन काढून परत तो अहवाल राज्यपालांच्या माध्यमातून राष्टपतींकडे द्यायचा असा एक पर्यांय आहे. त्यानंतर राष्ट्रपती मागास आयोगाला सूचना देऊ शकतील. अशा पद्धतीने राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळू शकते असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. अपवादात्मक परिस्थिती आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रपती यांच्याकडे जावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं

केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मराठा आरक्षणासंबंधी राज्याची भूमिका संपली असून आता केंद्र सरकारला आता लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही ते आता केंद्र सरकारने ठरवावं. राज्य फक्त आता शिफारस करु शकेल. त्यामुळे आता केंद्राची जबाबदारी आहे."

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर एस ई बी सी आरक्षणाचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या सहीने केवळ याचा आयोगाला असल्याचे निकालात म्हटले आहे. राज्यांना हे अधिकार नसल्याचं मत खंडपीठाने नोंदवलं होतं. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अपील केलं होतं. पण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज सुप्रीम कोर्टात केंद्राचीही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ एस ई बी सी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करायचे असतील तर हा निर्णय केवळ केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
Nashik NEET Paper Leak: माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Embed widget