एक्स्प्लोर

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, अजित पवारांना धक्का?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने अजित पवार यांच्या निकवर्तीयांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. कमी दरात कारखान्याचा लिलाव झाल्याचा आरोप आहे.

सातारा : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आली.

राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हाही दाखल केला होता. 2019 मध्ये नोंद एफआयआरच्या आधारावर हा पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता.

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. 2010 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

ईडीच्या दाव्यानुसार, गुरु कमॉडिटीजने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत. तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे, असं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.

थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या प्रकरणात गैरव्यवहार झाला असून अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Eknath Shinde VS Ganesh Naik : एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याने गणेश नाईकांची गाडी अडवली, नवी मुंबईत राडा, मंदा म्हात्रे म्हणाल्या, मी सुद्धा वैतागले, पुढचं पाऊल उचलणार!
एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याने गणेश नाईकांची गाडी अडवली, नवी मुंबईत राडा, मंदा म्हात्रे म्हणाल्या, मी सुद्धा वैतागले, पुढचं पाऊल उचलणार!
Tandulwadi Accident: 10 वर्षांपूर्वी 6 कलाकारांचा बळी, आता 8 जणांना गिळलं; तांदुळवाडीतील 'ती' विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा, 'त्या' दुर्दैवी आठवणी झाल्या ताज्या
10 वर्षांपूर्वी 6 कलाकारांचा बळी, आता 8 जणांना गिळलं; तांदुळवाडीतील 'ती' विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा, 'त्या' दुर्दैवी आठवणी झाल्या ताज्या
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार

व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Ek Hota Malin Marathi Movie: 12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
Embed widget