एक्स्प्लोर
Mira Bhayandar MNS Morcha: मिरा-भाईंदरमध्ये ॲक्शन सुरु, मनसे कार्यकर्ते दिसताच पोलीस धावले, सगळ्यांना बसमध्ये कोंबलं
Mira Bhaindar Morcha: पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर कालपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती.
Mira Bhaindar Morcha
1/10

MNS Mira Bhayandar morcha: मीरा-भाईंदर मध्ये मनसेच्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून परिसरात मनसे कार्यकर्ते दिसताच पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत .
2/10

मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून कुठल्याही कार्यकर्त्याला रस्त्यावर थांबू दिले जात नाहीये .
3/10

मनसेच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे .
4/10

आक्रमक पवित्रात असणारे मनसैनिक रस्त्यावर दिसताच पोलीस सगळ्यांना बसमध्ये कोंबत असल्याचं दिसत आहे
5/10

अनेक मनसे कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आला आहे .
6/10

मिरा-भाईंदर मध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय .
7/10

बालाजी हॉटेलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती . या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू आहे
8/10

मीरा भाईंदरमध्ये आम्ही सर्व ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमला आहे. महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानकं आणि जंक्शनच्या परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
9/10

काल आम्ही शहरात रुट मार्च काढला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार दक्ष आहेत
10/10

मनसे कार्यकर्त्यांना गाड्यांमध्ये भरले जात असून पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहे.अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांनी सांगितले.
Published at : 08 Jul 2025 11:03 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























