एक्स्प्लोर

विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरुन विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्षांचं एका वाक्यात उत्तर

विधानभवनात आज विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी,  जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड  विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे आमदार उपस्थित होते.

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमधील महायुती सरकारचं दुसरं विधिमंडळ अधिवेशन होत असून अद्यापही राज्यात विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीही वर्णी लागली नाही. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीमधील (MVA) नेत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, अद्यापही त्याबाबतच निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना दिलेल्या सूचनेनुसार आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा समोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजीही केली.

विधानभवनात आज सकाळी विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी,  जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड  विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय कधी घेणार? हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना सभागृहात विचारण्यात आला. त्यावर, आपल्या दालनात यावर चर्चा झाल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.  तसेच, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्षांचे उत्तर महाविकास आघाडीतील आमदारांना रेकॉर्डवर मिळालं. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. तसेच, लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात यावी, अशी मागणीही आमदारांनी केली. 

विरोधी पक्षनेतेपदावरुन घोषणाबाजी

महाविकास आघाडीचे आमदार सभागृहातून थेट बाहेर येऊन त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केलं. सरन्यायाधीशांचा सत्कार होत असताना सभागृह विरोधी पक्षाविना असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते पदावर आक्रमक होऊन महाविकास आघाडीतील आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. एवढेच काय तर महायुतीतील आमदार एका मागे एक विधान भवनात प्रवेश करत असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

मराठी शाळेत शिकूनही सरन्यायाधीश - दानवे

सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्या बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इथं दोन्ही सभागृहाचे गटनेते असे म्हटले पण दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणून मी एकटाच आहे. ⁠काल महाराष्ट्रावर कोणी तरी बोलले, मात्र त्यांना उत्तर कृतीतून देण्याची आवश्यकता आहे. आताच आपण महाराष्ट्र गीत ऐकलं की, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्यामुळे गवईसाहेब हे तख्त राखत आहेत. ⁠डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक आज सरन्यायाधीश म्हणून बसतो, हे खर आहे. प्राथमिक शिक्षण मराठीत घेतल्यानंतरही सरन्यायाधीश पदावर जाता येतं याचे उदाहरण म्हणजे सरन्यायाधीश आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.  

हेही वाचा

Video : मंत्री प्रताप सरनाईकांसमोर 50 खोकेच्या घोषणा, प्रचंड विरोधानंतर मोर्चेकरांनी हुसकावून लावलं

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget