एक्स्प्लोर

Supriya Sule: सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा!

Supriya Sule : मीरा-भाईंदरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Supriya Sule on Devendra Fadnavis : मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं? त्यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहखातं आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणेएका शशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करायचा अधिकार  दिला आहे. ही लोकशाही आहे दडपशाही नाही. असेही त्या म्हणाल्या.

हे ओरिजनल भारतीय जनता पक्षाला न शोभणार कल्चर आलं कुठून- सुप्रिया सुळे

या सगळ्या गोंधळाला फक्त आणि फक्त गृहखातं आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळं आणि दुसऱ्यांदा वेगळच काहीतरी बोलतात ही सगळ्यात मोठी अडचण आहे. दुर्दैव आहे की मी समजत होते की भाजप हा एक सुसंस्कृत राजकीय पक्ष आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचं वागणं मग ते भाषा, प्रांत, वागणूक आणि ज्या धमक्या दिल्या जात आहे, हे ओरिजनल भारतीय जनता पक्षाला शोभणार नाही. हे न शोधणारा कल्चर भाजपमध्ये कुठून येत आहे? हे लोकशाहीला शोभणारी बाब नाही, अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

भाजपच याला जबाबदार- सुप्रिया सुळे

अर्थातच या सगळ्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. कारण अजित पवार म्हणतात हिंदी सक्ती मी नाही केली. शिवसेना शिंदे गट म्हणतो की ही सक्ती आम्ही नाही केली. मग याला जबाबदार कोण तर भारतीय जनता पक्षानेच हिंदी सक्ती केली. आम्ही हिंदी किंवा कुठल्याच भाषेच्या विरोधात नाही. मात्र केवळ आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही भाषेची सक्ती करू नका. असेही खासदार सुळे म्हणाल्या. मीरा-भाईंदर येथे मोर्चादरम्यान निर्माण झालेल्या गोंधळावर त्या बोलत होत्या.

....म्हणून देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत निर्णय घेतात- सुप्रिया सुळे

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. आझाद मैदानावर राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करत आहेत. त्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिक्षकांनी सगळं तुमच्या भावाच्या म्हणजेच अजित दादांच्या हातात आहे, बहीणीचं भाऊ ऐकेल. तुम्ही तुमच्या भावाला आधी सांगा ते मागण्या मान्य करतील असं सुप्रिया सुळे यांना म्हटलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा भाऊ जरी अर्थमंत्री असला तरी सरकारचा अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत निर्णय घेतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हाय हाय असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा

मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला, धरपकडीनंतर मनसैनिक आक्रमक!

अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी, मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं....

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
एकीकडे सोनं सव्वा लाखांवर, दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस 1 कोटी 12 लाखांना गंडा
एकीकडे सोनं सव्वा लाखांवर, दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस 1 कोटी 12 लाखांना गंडा
मग पहिला घोळ इथंच! पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसला, ही कसली निवडणूक? राज ठाकरेंकडून आयोगाच्या कारभाराची मोजक्याच शब्दात 'चिरफाड'
मग पहिला घोळ इथंच! पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसला, ही कसली निवडणूक? राज ठाकरेंकडून आयोगाच्या कारभाराची मोजक्याच शब्दात 'चिरफाड'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: 'निवडणूक आयोगाचा Server दुसराच कुणीतरी चालवतो'; Jayant Patil यांचा गंभीर आरोप
Urban Naxalism: 'येत्या काळातली लढाई संविधान विरुद्ध शहरी माओवादी', CM Devendra Fadnavis यांचा इशारा
Ghatkopar Heist: घाटकोपरमध्ये भरदिवसा 'दर्शन ज्वेलर्स'वर दरोडा, मालकावर चाकू हल्ला, हवेत गोळीबार!
Forced Conversion : 'कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण', वादग्रस्त Beed अधीक्षक Petrus Gaikwad यांची उचलबांगडी
Maharashtra Politics : बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रीपद सोडलं, अजित पवारांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
एकीकडे सोनं सव्वा लाखांवर, दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस 1 कोटी 12 लाखांना गंडा
एकीकडे सोनं सव्वा लाखांवर, दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस 1 कोटी 12 लाखांना गंडा
मग पहिला घोळ इथंच! पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसला, ही कसली निवडणूक? राज ठाकरेंकडून आयोगाच्या कारभाराची मोजक्याच शब्दात 'चिरफाड'
मग पहिला घोळ इथंच! पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसला, ही कसली निवडणूक? राज ठाकरेंकडून आयोगाच्या कारभाराची मोजक्याच शब्दात 'चिरफाड'
पतंजली वेलनेसच्या आयुर्वेदिक उपचारानं कर्करोग, मधुमेह आणि मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना मिळालं नवजीवन
पतंजली वेलनेसच्या आयुर्वेदिक उपचारानं कर्करोग, मधुमेह आणि मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना मिळालं नवजीवन
Video: न्याय द्या, न्याय द्या... मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ; लेकीसाठी आईच्याही डोळ्यात अश्रू
Video: न्याय द्या, न्याय द्या... मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ; लेकीसाठी आईच्याही डोळ्यात अश्रू
ठाकरे बंधू ते जयंत पाटील ते बाळासाहेब थोरातांनी धडाधड पुरावे मांडले; निवडणूक आयोगाच्या कारभाराची पोलखोल, मतदारयादीमधील घोळ समोर आणला
ठाकरे बंधू ते जयंत पाटील ते बाळासाहेब थोरातांनी धडाधड पुरावे मांडले; निवडणूक आयोगाच्या कारभाराची पोलखोल, मतदारयादीमधील घोळ समोर आणला
... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती
... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती
Embed widget