एक्स्प्लोर
Mira Bhayandar MNS Morcha: मिरा-भाईंदरमध्ये मोर्च्यादरम्यान वाद चिघळला; दोन बस भरल्या, रिक्षाही भरल्या, पण मनसेचे कार्यकर्ते ऐकेनात
मिरा-भाईंदरमध्ये मोर्च्यादरम्यान वाद चिघळला असून पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नसल्याने पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना पोलिसांनी धरपकड करत अटक केली आहे.
Mira Bhayandar MNS Morch
1/6

Mira Bhayandar MNS Morcha मुंबई: मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची (MNS-Shivsena UBT Morcha) हाक दिली होती. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नसल्याने पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना पोलिसांनी धरपकड करत अटक केली आहे.
2/6

मिरा-भाईंदरमध्ये मोर्च्यादरम्यानचा वाद आता चिघळला असून आंदोलक कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याची मनस्थितीत नाहीये. परिणामी, पोलीसांनी पोलीसी बाळाचा वापर करत शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
3/6

पुढे आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन बस भरल्या, रिक्षाही भरल्या असून आता तिसरी बस देखील दाखल झाली असून पोलिसांकडून आंदोलकांना अटक केली जात आहे.
4/6

असे असले तरी मनसेचे कार्यकर्ते, मराठी प्रेमी, आंदोलकांसह इतर संघटनेचे कार्यकर्ते ऐकत नसल्याचे बघायला मिळाले आहे.
5/6

सध्या मिरा-भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. अजूनही पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होताना दिसतोय. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की होत असल्याचे चित्र आहे.
6/6

दरम्यान, मनसेच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही, यावरून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे.
Published at : 08 Jul 2025 12:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























