जीआरमध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरु देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला (Mumbai Maratha Protest) मोठं यश मिळालं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला (Mumbai Maratha Protest) मोठं यश मिळालं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. यानंतर एका तासात या मागण्यांचा जीआर काढणार असल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. जर जीआरमध्ये काही फसवणूक झाली तर महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटीलांनी दिला आहे.
सरकारने तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना मान्य
सरकारने तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना मान्य आहे. त्यामुळं सरकार पुढच्या एका तासात जीआर काढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जीआर काढण्यासाठी अधिकारी रवाना झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासोबत असलेल्या अभ्यासकांना देखील सरकारनं काढलेला मसुदा मान्य झाला आहे. मसुदा एकदम योग्य असल्याचं अभ्यासकांचं देखील मत आहे. सरकारवर विश्वास ठेवा. जर जीआरमध्ये फसवणूक झाली तर महाराष्ट्रात एकपण मंत्री फिरु देणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. जीआरमध्ये काही चूक झाली तर तो जीआर फेकून देऊ असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हैद्राबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीस उपसमितीने मान्यता दिली आहे, याचा अर्थ हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याची सूचना उपसमितीकडून देण्यात येईल. सातारा गॅजेटबद्दल आपण मागणी केली होती, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठा यामध्ये येतो. औंध आणि सातारा मध्ये काही त्रुटी आहेत. पुढील 15 दिवसात कायदेशीर त्रुटीचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल, असे शासनाने म्हटले आहे.
मराठा-कुणबी एकच, जीआरसाठी 2 महिने मुदत
मराठा आणि कुणबी आहे असा जीआर काढा, मराठा कुणबी एकच हा जीआर जारी करा. त्यावर, ते म्हणाले किचकट आहे त्याला वेळ लागेल म्हणे, 1 महिना लागेल. पण, मी म्हणतो त्याला 2 महिने घ्या पण जी आर काढा. आता सगेसोयरेचा निर्णय घ्या म्हणालो. ते म्हणताय याला वेळ लागेल, 8 लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे. आता, हैदराबाद आणि सातारा या 2 गॅजेटच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. बाकी 5 मागण्यांचा शासन निर्णय काढू म्हणत आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या:























