अमोल मिटकरींना सभा घेतल्यामुळेच मी जिंकलो, तेच माझे गुरु, मंत्री कोकाटेंकडून मिटकरींचं तोंडभरुन कौतुक
ज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आमदार अमोल मिटकरींची (Amol Mitkari ) तोंडभरुन स्तुती केलीय.
Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आमदार अमोल मिटकरींची (Amol Mitkari ) तोंडभरुन स्तुती केलीय. एव्हढेच नव्हे तर अमोल मिटकरी आपले 'गुरु' असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणालेय. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी आपल्या मतदारसंघातून सभा घेतल्यानेच आपण 3000 मताने का होईना, मात्र काठावर निवडून आल्याचं कोकाटे म्हणालेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन महत्वाची नावं म्हणजे एक माणिकराव कोकाटे आणि दुसरे अमोल मिटकरी. एक पक्षाचा मंत्री, तर दुसरा पक्षाचा आमदार. मात्र दोघांनाही जोडणारा एक सामायिक धागा म्हणजे त्यांची वादग्रस्त वक्तव्य. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हे दोन्हीही नेते एकत्र एकाच व्यासपीठावर आले होते. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचत एकत्र आले होते. अकोट शहरातील झुनझूनवाला सभागृहात अकोला जिल्ह्याचा पक्ष कार्यकर्ता आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. त्यावेळी ते बोलत होते.
माणिकराव कोकाटे गेली पाच टर्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून विजयी
या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार अमोल मिटकरींची तोंडभरून स्तुती केलीय. एव्हढेच नव्हे तर अमोल मिटकरी आपले 'गुरु' असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणालेय. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी आपल्या मतदारसंघातून सभा घेतल्यानेच आपण 3000 मताने का होईना, मात्र काठावर निवडून आल्याचं कोकाटे म्हणालेत. दोघांचंही दुखणं सांगताना माणिकराव कोकाटे म्हणालेत की, बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात. मात्र, आपण आता आणि भविष्यातही अमोल मिटकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणालेय. माणिकराव कोकाटे गेली पाच टर्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांतून विधानसभेवर निवडून येतायेत. तर अमोल मिटकरी पहिल्यांदाच विधान परिषदेचे आमदार बनलेयेत. त्यातच कोकाटे यांनी मिटकरींना गुरु म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यायेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या
दरम्यान, याच कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येनं निवडून द्या. अजित पवारांचे हात बळकट करा, असं आवाहनही यावेळी माणिकराव कोकाटे यांनी केलंय. दरम्यान, शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना त्यांनी सरकार सर्वच आमदारांना समान निधी देत असल्याचे म्हटलंय. शहरानुसार निधीचे हेड बदलत असल्याने निधी कमी-जास्त होत असल्याचं ते म्हणाले.
























