तर भारतातील 60 ते 70 टक्के लोकांना डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासणार नाही, नितीन गडकरी यांचा कानमंत्र; म्हणाले....
आपण जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणपासून मुक्तता तसेच कीटकनाशक विरहित भाजीपाला या गोष्टीही जोडल्या, तर 60 ते 70 टक्के लोकांना डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासणार नाही, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
Nagpur News नागपूर : सामान्य माणसाचे जीवन सुसह्य बनवण्यामध्ये Cleanliness campaignची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर स्वच्छता मोहिमेत आपण जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणपासून मुक्तता तसेच कीटकनाशक विरहित भाजीपाला या गोष्टीही जोडल्या, तर भारतातील 60 ते 70 टक्के लोकांना डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले आहे. आज नागपूर महानगरपालिकेद्वारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2024) आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत नितीन गडकरी सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान महात्मा गांधी यांची स्वच्छता मोहीम खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेली
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या (Mahatma Gandhi Jayanti) निमित्ताने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये नितीन गडकरी ही प्रतिनिधी स्वरूपात सहभागी झाले होते. महात्मा गांधींनी आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती स्वच्छता मोहीम खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेली असून स्वच्छतेचे महत्व आता लोकांनाही पटू लागले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्य ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकार केली पाहिजे, असे मत गडकरींनी यावेळी व्यक्त केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी महात्मा गांधींजींचे विचार सांगत राज्यातील वाचाळवीरांना टोला लगवला आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे.
राज ठाकरे आपल्या फेसबुकपोस्टमध्ये म्हणाले, आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर 75 वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :