Gandhi Jayanti 2024 Quotes: जीवनात मोठी शिकवण देतात गांधीजींचे 'हे' 10 विचार, प्रत्येकासाठी महत्त्वाचे, विविध अडचणींवर मिळेल समाधान
Gandhi Jayanti 2024 Quotes : गांधीजींचे विचार त्यांच्या कृतीतून सर्वांनाच दिसले. पण गांधीजींनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर आजही जीवनातील असंख्य समस्या सुटू शकतात.
Gandhi Jayanti 2024 Quotes : रघुपती राघव राजाराम...पतित पावन सीताराम... महात्मा गांधींचे हे बोल सर्वांनाच माहित आहे. (Mahatma Gandhi Quotes) आज देशातील प्रत्येकाला गांधीजींचे नाव माहीत आहे. त्यांना त्यांच्या फोटोवरून सगळेच ओळखतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की गांधीजीं नेमके कोण होते? त्यांना ओळखणे का महत्त्वाचे आहे? अगदी लहान वर्गापासून मुलांना महात्मा गांधींबद्दल शाळांमध्ये का सांगितले जाते? गांधीजींनी देशासाठी काय केले? हे जाणून घेण्याबरोबरच गांधीजींचे विचार काय होते? हेही समजून घेणे गरजेचे आहे. कारण त्यांचे विचार त्यांच्या कृतीतून सर्वांना दिसले. गांधीजींनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर आजही जीवनातील असंख्य समस्या सुटू शकतात. असा विश्वास समर्थकांमध्ये आहे. (Gandhi Anmol Vichar)
गांधीजींचे 'हे' अनमोल विचार
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाचमाझा धर्म आहे
‘सत्य’हा माझा देव आहे आणि
‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे- महात्मा गांधी
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,
नंतर तुमच्यावर हसतील,
नंतर भांडतीलही; पण
सरतेशेवटी विजय तुमचाच असेल- महात्मा गांधी
माझ्यातल्या उणीवा..
माझं अपयश हे माझं यश आणि
माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वाहतो- महात्मा गांधी
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर
बलवानांचे शस्त्र आहे- महात्मा गांधी
देवाला कोणताच धर्म नसतो- महात्मा गांधी
आम्ही आमचा स्वाभीमान कुणाला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही- महात्मा गांधी
एखादा देश आणि त्याची नैतिक
मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी
वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते- महात्मा गांधी
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता
पण माझ्या मनाला कैद
करू शकणार नाहीत- महात्मा गांधी
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील
हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही
पण तुम्ही काहीच केले नाहीत,
तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही- महात्मा गांधी
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो- महात्मा गांधी
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमानं जिंका- महात्मा गांधी
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा..तुमचं 'स्व' तुम्हाला सापडेल- महात्मा गांधी
ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा- महात्मा गांधी
जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा- महात्मा गांधी
हेही वाचा>>