एक्स्प्लोर

Weather Updates : राज्यात कुठे थंडी तर कुठे पाऊस, माथेरानपेक्षाही मुंबईचा पारा घसरला

Weather Updates : राज्यात कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. तर राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.

Weather Updates News : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. तर राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात सध्या पाऊस आणि थंडीचा खेळ आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात थंडीचा कडाखा वाढला आहे. तसेच मुंबईतही (Mumbai) तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दुसरीकडं मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशावर गेले आहे. त्यामुळं मुंबईतही थंडी वाढली आहे. तर थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 अंश आहे. मुंबईत सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी वाजत आहे. 

जळगाव जिल्ह्याचा पारा 9 अंशावर 

जळगाव जिल्हा उच्च तापमानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा 9 अंशावर गेला आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. 
उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

या भागात पावसाचा अंदाज 

महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या  आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होवून थंडीचे प्रमाण कमी जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नसून थंडीचा प्रभाव तिथे कायम असल्याची माहिती खुळे यांनी दिली. दरम्यान अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी  पावसानं हजेरी लावली आहे. त्या ठिकाणच्या रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. 

गेल्या 122 वर्षांतला 2022 चा डिसेंबर महिना सर्वात उष्ण

गेल्या 122 वर्षांतला 2022 सालचा डिसेंबर महिना हा सर्वात उष्ण ठरला आहे. सरासरी तापमानाच्या 1 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सरासरी तापमान 21.49 अंश सेल्सिअस राहिलं आहे.  सोबतच डिसेंबर महिन्यातील किमान आणि कमाल तापमान देखील सर्वोच्च राहिल्याची नोंद झाली आहे. भारताला जागतिक तापमानवाढीचे चटके बसत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम, तुडतुडा रोगासह मोठ्या प्रमाणात फळगळ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Embed widget