Weather Update: कोकणसह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीचा जोर वाढणार, येत्या 5 दिवसांत तापमान घसरणार, IMD ने सांगितलं...
आता राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या 4 दिवसांपासून किमान तापमानात चढउतार दिसून येत आहे. पहाटे गारठा कायम असून शुष्क व कोरडे हवामान आहे. गेल्या दोन दिवसात किमान तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीचा जोर कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका वाढलाय. राज्यात किमान तापमानाचा (Temperature) पारा आता 15-23 अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात हवामानात मोठे बदल होणार असून वाढलेल्या किमान तापमानाच्या पाऱ्यात आता 1-2 अंशांनी घट होणार आहे. तर कमाल तामपानात वाढ होणार आहे. येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे वातावरण राहणार असून पावसाची शक्यता नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात काहीशी घट होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढू लागेल. तर कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज देण्यात आल्याने उकाड्याचा सामनाही करावा लागेल.(IMD Forecast)
हवामान विभागाचा अंदाज काय?
आसाम आणि परिसरात सध्या चक्राकार वाऱ्यांचे झोत सक्रीय आहेत. त्यामुळे पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्याचे झोत असल्याने थंडीत चढउतार होत आहे. भारतीय हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालं असून येत्या तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत.परिणामी तापमानावर त्याचा परिणाम होणार आहे.
कुठे किती तापमानाची होतेय नोंद?
शुक्रवारी (25 जानेवारी) मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 11-21 अंशांपर्यंत होता. मुंबईत कुलाब्यात 21.2 अंश सेल्सियसची नोंद झाली. सांताक्रूझ भागात 19.3 अंश सेल्सियस तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात 17.8 अंश तर लातूरमध्ये 19.9 अंश तापमान होतं. पुण्यात 14- 16 अंश तापमान होतं.मराठवाड्यात येत्या पाच दिवसात तापमानात 2-3 अंशांनी घट होणार असून कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही किमान व कमाल तापमानात बदल होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
