एक्स्प्लोर

मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?

लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून.

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून दोन्ही समाज बांधव आरक्षणाच्या लढाईसाठी आंदोलनाचं मैदान गाजवत आहेत. एकीकडे मराठा समाजाला (Maratha) ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत, तर ओबीसी (OBC) आरक्षणात मराठ्यांचा सहभाग नसावा म्हणून लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते पुढे सरसावले आहेत. त्यामध्ये, लक्ष्मण हाके हे आक्रमकपणे भूमिका मांडत असून थेट पवार कुटुंबावर शा‍ब्दिक हल्ला करत आहेत. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यावरही ते जोरकसपणे टीका करत असल्याचे दिसते. त्यातून, त्यांना फोनद्वारे धमक्याही दिल्या जात आहेत. तर, दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडूनकडूनही त्यांना डावललं जात असल्याची चर्चा आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण हाकेंनी केलेली फेसबुक पोस्टही चांगलीच चर्चेत आहे. त्यावरुन, लक्ष्मण हाके (Laxman hake) आंदोलन पुढे नेणार की सोडणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली. उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात. मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही. उद्या दैत्यानांदूर ता.पाथर्डी जि. अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, असे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो, असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासंदर्भात आपण उद्या भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, त्यांची भूमिका त्यांना मिळणाऱ्या धमक्यामुळे आहे की, ओबीसी नेत्यांकडून डालवण्यात येत असल्याने, हेही उद्याच कळेल.

पकंजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर लाँच (pankaja munde dussera melava)

वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर आता समोर आला आहे. संत भगवान बाबाची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर रोजी असणार आहे. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मुंडे समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात. याच मेळाव्याच्या टिझर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक वर पोस्ट केला आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्र्यांच्या हातात फाईल, 1 तास चर्चा; PM मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, कर्जमाफीवरही बोलले

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
Rohit Pawar : भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Parbhani : परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात
परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget