एक्स्प्लोर

ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!

माझ्या डोळ्यादेखत माझ्या शेळ्या वाहून गेल्या हो, जनावरं पण वाहिली होsss, दाटलेला कंठ, डोळ्यात साचलेलं पाणी, आणि गहिवरुन आणणारे ओठांवरील हे शब्द होते पुराने सगळं गमावलेल्या बेलगावच्या विश्वनाथ दातखिळे यांचे. 

भूम तालुक्यातल्या (Dharashiv) दातखिळेनी गेल्या 25 वर्षात जे उभारलं, जे कमावलं ते अख्ख अवघ्या काही क्षणात पुराच्या पाण्यानं गिळून टाकलं. 47 जनावरं, शेकडो कोंबड्या, शेळ्या, बोकडं, 5-6 एकरावरील पिकं एवढं सगळं वाहून गेलं, त्यासोबतच वाहून (Flood) गेली अनेक स्वप्न, लेकराबाळंचं भविष्य आणि आयुष्यभराची कमाई. ही व्यथा एकट्या दातखिळे यांचीच नाही तर, ही व्यथा मराठवाड्यातील कित्येक शेतकऱ्यांची (Farmers) आहे, कित्येक तरुण युवकांची आहे, गावखेड्यातील अनेक माय-बापांची आहे, तरीही पुन्हा नव्याने उभं राहू हा विश्वास ह्या सगळ्यांमध्ये दिसतोय. म्हणूनच दातखिळे म्हणतात मी पुन्हा हे उभं करतो, पण आत्महत्या करणार नाही. इडा गावचा युवक सूरज यादव, गेल्या 8 वर्षांपासून नर्सरीचा व्यवसाय करतोय, आता कुठं स्थिरावत होता, पण पुराच्या पाण्यात उद्योजक बनायची त्याची स्वप्न वाहून गेली, रोपं मातीमोल झाली, तर नर्सरीतील 6 लाखाच्या मशिनीत गाळ साचलाय. तरीही उठून उभं राहण्याची त्याची जिद्द कायमय.

कवी कुसुमाग्रजानी म्हटलंय, 
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही 
कणा, पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा. 

पण, पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणण्याएवढं सोप्प हे दुःख नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांनी बांधावर जाऊन तेच केलंय, पाठीवर हात ठेऊन 'फक्त लढ' म्हणून ते परतले. कारीतला एक तरणा बांड शेतकरी मंत्र्याचा ताफा अडवून म्हणतो, गोगावले शेठ तुमची एकरी 3400 रुपयांची मदत आमच्या तळवटालाही पुरणार नाही. हेच वास्तव आहे. पण, इथंही काही मंत्र्‍यांना शेतकऱ्यांच्या भाषेवर आक्षेप वाटतोय, इथं त्यांच्यातल्या मंत्रि‍पदाचा इगो जागा होतोय. कुणाला राजकारण करु नको असं बोललं जातंय, तर कुणाला आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का, अशी दादागिरी केली जातीय. पण, स्वत:ला त्यांच्या जागी ठेऊन बघा, ज्याचं सगळं गेलंय त्यांच्याकडून तुम्ही भाषेच्या सोज्वळपणाची, मर्यादेची अपेक्षा तरी कशी करताय. त्यामुळे या संकटातून बाहेर कसं पडायचा हा यक्षप्रश्न आहे. 

केंद्र सरकारने मदतीच पॅकेज जाहीर करावं, त्याने अन्नात कालवलेली ही माती वेगळी करता येणार नाही, पण बुडत्याला काडीचा आधार होईल. शेवटी शेतकरी ही जातच रानावनातून जन्म घेती, दिवसागणिक काट्याकुट्याना तुडवीत आमची लेकरं मोठी होतात, त्यामुळे उद्याही ते मोठी होतील ह्या संकटाच्या छतडावर पाय रोवून नव्या दमानं शेती करून जगाचा पोशिंदा म्हणून मिरवतील. पण, आता फक्त पाठीवरती हात ठेऊन लढ म्हणू नका. मायबाप सरकार म्हणून बळीराजाचे अश्रू तुम्ही पुसा, गलबलून गेलेल्या त्यांच्या लेकरांना कुशीत घ्या, काळ्या आईचं वस्त्रहरण झालंय, पण श्रीकृष्णच्या भूमिकेतून पदर सांभाळायची जबाबदारी आता तुमचीच आहे, मायेला मायेचा आधार द्या, उध्वस्त झालेल्या तिच्या लेकरांना आपलंस करा.

कारी गावातली शेतकऱ्याची लेक बापाच्या आत्महत्येचा प्रसंग सांगते तेव्हा डोळ्यातल्या पापण्याला पाणी स्पर्श करतं, धाराशिवमधली चिमुकली जेव्हा, मला फक्त जीव पाहिजे, पाण्याची भीती वाटते असं म्हणते तेव्हा काळजात चर्र होतं. आपलं 4 वर्षाचं लेकरू डोळ्यादेखत वाहून जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील माऊलीचा आक्रोश पाहून गलबलून येतं. तर, जळगावमध्य लेकीचं पुसलेलं कुंकू, बापाविना आलेला पोरकेपणा आणि हरवलेलं मातृत्व मी शब्दात मांडू तरी कसं"? मुख्यमंत्रीसाहेब, इथं मोडून पडलाय संसार आणि मोडलाय कणा सुद्धा... आता या 'रयतेचा राजा' म्हणून तुम्हीच काहीतरी करा.

हेही वाचा

गहू तांदूळ मिळालं पण, 5 हजार नाही; चूल विझलेल्या प्रयागबाईंची व्यथा, गावच्या शाळेतील महापुरुषही पावसात

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satara Doctor Case:प्रशांत बनकर,गोपाळ बदने यांच्याविरोधात गुन्हा, कारवाईसाठी टीम रवाना - तुषार दोषी
Satara Doctor Case : 'राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळे बहिणीनं जीवन संपवलं', भावाचा गंभीर आरोप
Satara Doctor Case : फलटण प्रकरणातील दोन्ही पोलिसांना निलंबित करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
Satara Doctor Case : पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव होता - मुलीचे काका
Satara Doctor Case: सातारा डॉक्टर प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार, कठोर कारवाई करणार - चाकणकर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
Nashik Crime: नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Virat Kohli : विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
Embed widget