एक्स्प्लोर

आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन

आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका... आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

मुंबई: राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाचा (OBC) लढा आणि संघर्ष अद्यापही सुरूच असून एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणत ओबीसी नेतेही मैदानात उतरले आहेत. आरक्षणाच्या याच लढाईत दोन्ही समाजातील बांधव आपल्या आरक्षणाच्या काळजीपोटी टोकाचं पाऊल उचलत आहेत. नुकतेच बीडमध्येही एका युवकाने ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने जीवन संपवल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी भावनिक पोस्ट करत ओबीसी बांधवांना आवाहन केलं आहे. ओबीसी बांधवांनो, आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका... आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

परभणी जिल्ह्यातील आडगाव दराडे (ता. जिंतूर) येथील कुमार नारायण आघाव या ओबीसी तरुणाने "मी ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीपोटी आत्महत्या करीत आहे" अशी चिठ्ठी लिहून ठेवत, तसेच बीड जिल्ह्यातील तागडगाव येथील कांचन आदिनाथ सानप या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने देखील याच भीतीतून आपलं जीवन संपवलं. पाठोपाठ काल बीडचा रहिवासी असलेल्या राहुल पतंगे या तरुणाने देखील याच कारणातून आपला जीवनप्रवास थांबवला. आज बीड जिल्ह्यातील आत्माराम गणपत भांगे या रिक्षाचालकाने देखील याच मानसिक तणावातून आत्महत्या केली. या सर्व घटना अतिशय वेदनादायी आहेत. सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली! या सर्वांचे असे अकस्मात व अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबांसाठी खूप मोठा आघात आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सर्व ओबीसी संघटना सहभागी आहोत. एकामागोमाग होत असलेल्या या आत्महत्या म्हणजे ओबीसी समाजावर कोसळलेलं मोठं संकट आहे, असे म्हणत भुजबळ यांनी भावनिक साद घातली आहे.

अनेकांनी संपवलं जीवन (obc student)

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे जवळपास सरसकटच ओबीसी आरक्षण देणाऱ्या शासनाच्या जीआरमुळे समस्त ओबीसी समाज प्रचंड तणावात आहे. आपलं हक्काचं, संघर्षातून मिळवलेलं आरक्षण आता संपल्यात जमा आहे, अशी भावना झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांनी आपला जीवनप्रवास संपवला. गेल्या अवघ्या दोन-तीन आठवड्यांमध्ये वरील चौघांसह स्व. भरत महादेव कराड (वांगदरी, ता. रेणापूर, लातूर), स्व. गोरख नारायण देवडकर (नाथापूर, बीड), स्व. नागनाथ एकनाथ कांगणे (महालिंगी ता. कंधार जि. नांदेड), स्व. माणिक डोईफोडे, (सारोळा मांडवा, ता. वाशी, धाराशिव), स्व. धनंजय नाथा गोरे (हस्तपोखरी, ता. अंबड, जालना) स्व. निवृत्ती यादव (बर्दापूर, ता.अंबाजोगाई, बीड), स्व. भालचंद्र नवनाथ केकान (खंडाळा ता. जि. बीड) इतक्या लोकांनी स्वतःला मरणाच्या दारात ढकललं आहे.

छगन भुजबळांकडून आवाहन (Chhagan bhujbal appeal)

यात तरुण मुले-मुली यांच्यासोबतच आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात आल्याची भावना होऊन जीवन संपवणारे पालक देखील आहेत. शोषित, वंचित घटकांना संविधानिक, कायद्याने मिळालेला कोणताही हक्क हा प्राणवायूप्रमाणे असतो. तो असा कोणत्याही प्रकारे हिरावून घेतला गेला किंवा संकुचित केल्यानंतर घुसमट होणे स्वाभाविक आहे. त्या नैराश्यातूनच या सर्वांनी हे टोकाचं पाऊल उचललं. परंतु महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बंधू-भगिनींना, तरुण मुला-मुलींना, तसेच पालकांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, की कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका. भलेही आपल्या हक्कांवर अशा प्रकारे गदा आणली जात असेल, तरीही हे दुःखाचं सावट, हे संकट दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आपला न्यायव्यवस्थेवर, संविधानावर पूर्ण विश्वास असून आपल्याला नक्की मिळेल.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget