Maharashtra Weather Report : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी कायम
Maharashtra Weather Report : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहणार आहे. यानंतर 3 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Report : महाराष्ट्रात हवामान स्वच्छ व्हायला सुरुवात झाली असली तरी अजूनही थंडी जाणवत आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवत आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यानंतर 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याचे सांगितले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. तर, पावसानंतर हवेचे प्रदूषण सुधारू शकते. जाणून घेऊया राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आज हवामान कसे असेल?
मुंबई
आज मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 188 वर नोंदवला गेला आहे.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 28 तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 156 वर नोंदवला गेला.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान स्वच्छ राहील. त्याच वेळी, वायु गुणवत्ता निर्देशांक 120 आहे, जो मध्यम श्रेणीमध्ये येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही हवामान स्वच्छ राहील. मध्यम श्रेणीतील हवेचा दर्जा निर्देशांक 131 आहे.
औरंगाबाद
आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत 115 आहे
संबंधित बातम्या :
- Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घटतेय, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण
- Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीर खोऱ्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, गेल्या 12 तासांत जैशचे 5 दहशतवादी ठार
- North Korea : किम जोंग उन युद्धाच्या तयारीत? उत्तर कोरियाकडून एका महिन्यात 7 क्षेपणास्त्र चाचण्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha