एक्स्प्लोर

Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीर खोऱ्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, गेल्या 12 तासांत जैशचे 5 दहशतवादी ठार

Jammu Kashmir Encounter : गेल्या 12 तासांत पुलवामामध्ये चार आणि बडगाममध्ये एक दहशतवादी मारला गेला. ठार झालेल्यांमध्ये जैश कमांडर दहशतवादी जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या 12 तासांत झालेल्या दोन चकमकीत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

पुलवामा, बडगाममध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 12 तासांत पुलवामामध्ये चार दहशतवादी मारले गेले तर, बडगाममध्ये एक दहशतवादी मारला गेला. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर दहशतवादी जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या
दक्षिण काश्मीरच्या पुलवामाच्या नायरा भागात आणि मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच कारवाई करत, सुरक्षा दलांनी परिसर घेरण्यास सुरुवात केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा कर्मचारी शोध घेत असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या
काल दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची अनंतनागमधील बिजबेहारा येथील तबला भागातील हसनपोरा येथील त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. घनी यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget