(Source: ECI/ABP News/ABP Majha)
North Korea : किम जोंग उन युद्धाच्या तयारीत? उत्तर कोरियाकडून एका महिन्यात 7 क्षेपणास्त्र चाचण्या
North Korea Missile Test : उत्तर कोरियाने एका महिन्यात इतक्या शस्त्रास्त्रांची शेवटची चाचणी 2019 मध्ये केली होती. त्यावेळी हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील चर्चा अयशस्वी ठरली होती.
North Korea Missile Test : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या (Missile Test) करून इतर देशांवर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाकडून अज्ञात क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या (South Korea) लष्कराने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर कोरियाने एका महिन्यात सातव्यांदा शस्त्रास्त्रांची चाचणी करून आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे. याआधी उत्तर कोरियाने एका महिन्यात इतक्या शस्त्रास्त्रांची शेवटची चाचणी 2019 मध्ये केली होती. त्यावेळी हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हाय-प्रोफाईल चर्चा अयशस्वी ठरली होती. तेव्हापासून उत्तर कोरियाची अमेरिकेशी चर्चा ठप्प झाली आहे.
उत्तर कोरियाकडून नव्या वर्षात सातव्यांदा क्षेपणास्त्र चाचणी
दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तर कोरियाने पूर्व समुद्राच्या दिशेने अज्ञात क्षेपणास्त्र डागले आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने संभाव्य बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे.
आर्थिक परिस्थिती बिकट असताना क्षेपणास्त्र चाचण्या
देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात अमेरिकेने घेतलेल्या आण्विक स्फोटकांची आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली होती.
संबंधित बातम्या :
- Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीर खोऱ्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, गेल्या 12 तासांत जैशचे 5 दहशतवादी ठार
- Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घटतेय, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण
- Health Care : झटपट वजन कमी करायचंय? सब्जाचा करा आहारात समावेश, होतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha