एक्स्प्लोर

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर, तर विदर्भ आणि मराठवाड्यात साधारण थंडी, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान?

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र दिसत आहे.

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यात थंडी जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrav Khule) यांनी दिली. या 11 जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12  डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असू शकते. 

दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.  

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यन्तच्या पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 ते 16 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक दरम्यानचे असु शकतात. विदर्भात 23 जानेवारीनंतर 3 दिवसासाठी म्हणजे 25 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही. 

पावसाची कोणतीही शक्यता नाही

सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसून रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके आणि इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर या कालावधीत पीकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा आणि जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळ्याविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो. तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

संक्रांतीला मान्सून बाहेर थंडी आत, पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget