संक्रांतीला मान्सून बाहेर थंडी आत, पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान?
देशासह राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होतं आहे. कुठं थंडीचा कडाका आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे.
Maharashtra Weather : देशासह राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होतं आहे. कुठं थंडीचा कडाका आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. मान्सून बाहेर जाऊन थंडी आत आली आहे. संक्रांतीदरम्यानच्या या काळात थंडी जाणवणार असली तरी सध्या 17 ते 21 जानेवारी पर्यंतच्या पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातील शहरात पहाटेचे हे किमान तापमान एकांकी संख्येवर आले आहे.
महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसून रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके आणि इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर या कालावधीत पीकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा आणि जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळ्याविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो. तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे.
हिवाळी पावसाचा हंगाम यावर्षी 14 जानेवारीला आटोपला
हिवाळी पावसाचा हंगाम यावर्षी 14 जानेवारीला आटोपला आहे. तसा हा मान्सून डिसेंबरमधेच निघून जावयास हवा. यावर्षी उशीर होत आहे. तेथील मान्सून बाहेर पडला रे पडला की, महाराष्ट्रातही थंडीसाठी पूरकता वाढते. 14 जानेवारीला ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून, विषववृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी 'पुरवी' वारा झोताचा प्रभावही त्यामुळं कमी होईल. विषववृत्त दरम्यानचा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाब असलेले 'आंतर-कटिबंधीय अभिसरणीय परीक्षेत्र ' (इंटर ट्रॉपिकल कॉनवर्जिंग झोन) विषववृत्तवरील (शून्य डिग्री अक्षवृत्त) त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडे म्हणजे 10 डिग्री दक्षिण अक्षवृत्त (दक्षिण गोलार्धात)पर्यन्त सरकेल. त्यामुळं महाराष्ट्रतही हवेच्या उच्च दाबाच्या टेकड्यांना छेदून जाणारी काल्पनिक उंचावरील रेषा म्हणजे पोळ(' रिज ')ही दक्षिणे भारताकडेकडे सरकेल.
सूर्याचा धनू राशीत प्रवेश
सूर्याचा धनू राशीत प्रवेश होतो, म्हणून झुंझूरमास बरोबर धनुर्मास ही म्हणतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. म्हणून तर ह्या संक्रांतीला मकर संक्रांती संबोधले जाते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड राज्ये त्यामानाने समुद्रसपाटीपासून त्यामानाने कमी उंचीवर तसेच सखल मैदानी भाग संरचनेमुळं येथील बांधणाऱ्या अतिथंडीला व त्यातून उदभोवणाऱ्या त्रासिक जनजीवनाला ह्या कालावधीत लोकं वैतागलेली असतात. तिथे संक्रांतीनंतर जीवन थंडी कमी झाल्यामुळं दैनंदिन जीवन सुसह्य होते. हा आनंद ' लोहोरी ' उत्सव म्हणून साजरा करतात. 'शेकोटी' किंवा 'आगटी' पेटवून कि ज्याला त्यांच्याकडे ' लोहोरी ' म्हणतात, त्याभोवती एकत्र येऊन स्रिया -पुरुष नृत्य सादर करतात. तीळ, गूळ, नैवाद्य अग्नीला अर्पण करतात. बाधित होणाऱ्या थंडी पासून सुटका आणि आल्हाददायक, लाभदायी अश्या थंडीला सुरवात होते म्हणून हर्षउत्सवात अश्या थंडीचे स्वागत म्हणून ' लोहोरी ' साजरी करतात.
पृथ्वीचे उत्तरायण चालू
महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची शेतात साजरी होणारी ' येळ '(वेळ) अमावस्या ह्याच कालावधीत येते. नवीन येणाऱ्या धान्यांची, अन्नाची पूजा केली जाते. शास्त्रीयदृष्ट्याही ह्या कालावधीला महत्व आहे. ह्या कालावधीतील सकाळच्या वेळेस हवेत ऑक्सीजनचे प्रमाण अधिक तर ओझोनचा थर अतिशय शुद्ध असतो. म्हणून तर आहार- विहार जाणीवपूर्वक केला जातो. त्या दिवसानंतर म्हणजे मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग हळूहळू सूर्यापासून दूर तर विषववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालू होते.
महत्त्वाच्या बातम्या: