एक्स्प्लोर

Transfer : अधिकाऱ्यांना विदर्भ अन् मराठवाडा नको, फक्त पश्चिम महाराष्ट्र पाहिजे; क्रीम पोस्टिंगसाठी कामावर हजर न होणाऱ्या 11 अधिकाऱ्यांचे निलंबन, सरकारचा गर्भित इशारा

Maharashtra Officer Transfer : एप्रिलमध्ये बदलीच्या नोटिस काढूनही अनेक अधिकारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर झालेले नव्हते. त्यांचं आता निलंबन करण्यात आलं आहे. 

मुंबई: बदली झाल्यानंतरही कामावरती रुजू न झालेल्या महसूल विभागातील 11 अधिकाऱ्यांवरती (Maharashtra Revenue Department Officer Suspension) निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. कामावरती रुजू होण्यासाठी या अधिकाऱ्यांना एप्रिल पासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न आल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाने अधिकाऱ्यांना थेट गर्भित इशारा दिलेला पाहायला मिळतोय.  मात्र वर्षानुवर्ष अनेक अधिकारी क्रीम पोस्ट वरती राहतात. यांचाही प्रश्न आता  ऐरणी वरती आलेला पाहायला मिळतोय. 

आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे हा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नेहमीच आग्रह पाहायला मिळतो. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी कसरत करत असतात. हीच कसरत महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची ही सुरू होती. मात्र महसूल विभागाने या अधिकाऱ्यावर कारवाईचा चांगलाच बडगा उगारलेला  पाहायला मिळतोय. बदली झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर 11 अधिकारी कामावर रुजू झाले नाही. या सर्वांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत. 

एप्रिलमध्ये महसूल विभागातल्या बदल्या झाल्यानंतर जवळपास 35 अधिकारी कामावर  रुजू झालेले नव्हते. यावेळी अनेकदा महसूल विभागाकडून त्यांना रुजू होण्यासाठी नोटीस काढल्या होत्या. त्यातील अनेक अधिकारी कामावर रूजू झाले. मात्र  अधिकारी अद्याप ही रुजू झाले नाही. अखेर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची यादी 

राज्यात मुंबई, पुणे, अमरावती , औरंगाबाद नागपूर  आणि नाशिक असे सहा महसूल विभाग आहेत. या महसुली विभागापैकी नागपूर आणि अमरावतीसाठी अधिकारी रुजू हेण्यास  शक्यतो तयार होत नाहीत. त्यामुळे नागपूर विभागात रुजू न होणाऱ्या सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आल आहे. 

- विनायक थविल- (वडसादेसांगज- गडचिरोली)
- सरेंद्र दांडेकर (धानोरा गडचिरोली)
- बी.जे. गोरे (ऐटापल्ली गडचिरोली)
 - पल्लवी तभाने (संजय गांधी योजना वर्धा)
- सुनंदा भोसले -(खरेदी अधिकारी नागपूर)
- बालाजी सूर्यवंशी -(अप्पर तहसीलदार नागपूर)
- सुचित्रा पाटील -(करमणूक शुल्क अधिकारी नाशिक).

तर यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंग मोहिते यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

काय आहेत बदलीचे नियम?

बदलीचे नियम जर पाहिले तर जिल्ह्यात बदली झाली असेल तर तीन दिवसात आणि जिल्ह्याबाहेर बदली झाली असेल तर सात दिवसात बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागते. जर अधिकारी रुजू झाले नाही तर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते.  पर्याप्त कारण असेल तर विभाग ते ग्राह्य धरते आणि पर्याप्त कारण  नसेल तर कारवाई केली जाते. या नियमानुसार महसूल विभागाने अनेकदा या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली असल्याची माहिती समोर आहे.

आजकाल कोणतीही बदली पाहिजे असेल तर शिफारस पत्र आवश्यक मानलं जातं. त्यासाठी अनेक अधिकारी आमदार, खासदार, मंत्री आणि थेट मुख्यमंत्री यांच्या शिफारसीसाठी मंत्रालयात फेऱ्या मारताना पाहायाला मिळतात. 

वर्षानुवर्षे क्रीम पोस्टिंगवर काम करणाऱ्यांचे काय?

नाण्याच्या दोन बाजू असतात तशा प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. त्यातील या घटनेतील एक बाजू म्हणजे जे अधिकारी कामावर रुजू झालेले नाही, त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करून या विभागातील अधिकाऱ्यांना थेट इशारा दिलेला पाहायला मिळतोय. मात्र दुसरी बाजू म्हणाल तर ती ही  तेवढीच महत्त्वाची आहे. विशिष्ट अधिकारी विशिष्ट  क्रीम पोस्टिंगवरतीच वर्षानुवर्षे पाहायला मिळतात. त्याचा ही विचार कधी होणार का? हा ही प्रश्न तेवढाच ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET UG 2026 : नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
नीट पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले; NTA प्रमुखांचा मोठा दावा, काय आहे पुढचा प्लॅन?
Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2026 | गुरुवार
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget