एक्स्प्लोर

Raju shetti : मला मिश्या नव्हत्या तेव्हापासून साखर उद्योग अडचणीत, राजू शेट्टींची कोपरखळी

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याची जीएसटी इतकी दिवस थकू का दिली असा सवाल करत याला सरकारचा आशीर्वाद होता का असा सवाल  राजू शेट्टी यांनी  केला आहे.

पंढरपूर:  मी वीस बावीस वर्षाचा होतो तेव्हापासून साखर कारखाने अडचणीत असल्याचे ऐकत आहे.  मला मिश्या फुटल्या आता त्या मिश्या पांढऱ्या झाल्या तरी हेच ऐकायचे का अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार यांनी साखर कारखान्यांबाबत कठोर भूमिका घेतल्यावर फडणवीस यांनी पुन्हा शासनाला हमी देण्याबाबत निर्णय फिरविल्याने शेट्टी यांनी फडणवीस यांना टोले लगावले आहे.

अजित पवार यांचे खाजगी कारखाने झाल्याने त्यांना उशिरा का होईना शहाणपणा सुचले आणि त्यांनी साखर कारखान्याच्या थकहमी बाबत योग्य ठाम भूमिका घेतली. कारखान्याच्या कर्जाची हमी शासनाने का घ्यावी? कारखान्यांनी पैसे बुडविले तर ते पैसे सरकारला म्हणजे जनतेला द्यावे लागतात असे सांगताना जर खाजगी कारखाने स्वतः हमीवर कर्ज घेऊन फेडतात मग यांनाच कशाला शासनाची हमी पाहिजे असा सवाल केला. या कारखान्यांना कारखाना मोडून खायचा आहे.त्यांचा हेतू स्वच्छ नाही म्हणून त्यांना वारंवार हमी द्यायची वेळ येते असा टोला राजू शेट्टी यांनी फडणवीस यांना लगावला आहे. 

पंकजा मुंडेंवर सरकारचा आशीर्वाद होता का?

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याची जीएसटी इतकी दिवस थकू का दिली असा सवाल करत याला सरकारचा आशीर्वाद होता का असा सवाल  राजू शेट्टी यांनी  केला आहे. भुजबळ यांच्यावर नेमके आरोप काय हेच आठवत नसल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितल्याचे निदर्शनास आणून देताना मग भुजबळ तीन वर्षे जेलमध्ये का होते असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला . 

सध्या आम्ही राजकीय पक्षातील नेत्यांना संघटनेत प्रवेश देणे बंद केल्याचे सांगताना हा कच्चा माल आमच्याकडे येतो प्रॉडक्ट होऊन बाहेर पडतो आणि मार्केटमध्ये विकला जातो. आमच्या संघटनेचा वापर फक्त कार्यशाळेसारखा होऊ लागल्याने आता आम्ही कच्चा माल देखील पारखून घेत असल्याची मिश्किल टिप्पणी शेट्टी यांनी केली.

सरकारचा प्रशासनावर वचक नाही

नांदेड येथे हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत शिंदे फडणवीस सरकारला निशाणा करताना सरकार आपल्या दारी येऊन अशी अवस्था होत असेल तर सरकारला आता आमच्या परसदारी यावे लागेल असा टोला लगावला. सरकारचा प्रशासनावर वचक नाही फक्त इव्हेन्ट करून प्रसिद्धी मिळविण्याचे ढोंग  हे सरकार करत असल्यानेच दवाखान्यात रुग्णांचे बळी जातात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या असल्याची टीका करताना एकंदरच या सरकारचे कामकाजाकडे लक्ष नाही आणि प्रशासनावर पकड नाही अशा शब्दात शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi Sammelan

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Embed widget