एक्स्प्लोर

Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार! नदीच्या पुरात कार गेली वाहून, भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Weather Update : बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान या नदीत कार अक्षरशः डोळ्यादेखत वाहून नेलीय.

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं  (Maharashtra Rain Update) अक्षरश: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार राज्यासह विदर्भात मुसळधार पावसानं (Vidarbha Weather Update) एकच दाणादाण उडवली आहे. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या पावसाचा फटका रेल्वे, रस्ता आणि हवाई वाहतुकीवर देखील झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या उशीराने प्रवास करत आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. अशातच आता बुलढाणा (Buldhana Rain News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अक्षरशः डोळ्यादेखत कार गेली वाहून 

बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही नदी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने खळखळायला लागली आहे. दरम्यान या नदीच्या कडेला उभी असलेली एक चार चाकी इन्होवा कार अक्षरशः डोळ्यादेखत नदीच्या पाण्याने वाहून नेलीय. नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणीही बसलेले नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.  नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चार चाकी वाहनाच्या बरोबरीनने वाहून गेले आहे.

विदर्भातील नदी नाल्याला पुराचे स्वरूप 

बुलढाणा जिल्ह्याप्रमाणेच अकोल्यातही गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत केलंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोल्यातल्या अनेक रस्त्याला नद्यांचं स्वरूप आलंय. त्यातच बाळापुर तालुक्यातल्या मन नदिला देखील पुर आलाय. रस्त्यावरील पाणी नदीत जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.

याच दरम्यान बाळापुर येथील रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यात दुचाकी वाहून जात असताना काही लोकांनी दुचाकी चालकाला आणि दुचाकीला सुखरूपपणे बाहेर काढले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्यावरून वाहन चालत असताना अनेक नागरिक खाली कोसळत आहेत आणि त्यांच्या अंगाला मोठ्या प्रमाणात जखमा देखील होत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी, असा आवाहन नागरिकांनी केलं आहे.  

घराची भिंत अंगावर कोसळून इसमाचा मृत्यू

मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अशात आज दुपारी घराजवळ काम करीत असताना पावसानं जीर्ण झालेली घराची भिंत अचानक इसमाच्या अंगावर कोसळली. या घराच्या मलब्याखाली दबून इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावात घडली. योगेश देशमुख (३५) असं मृतकाचं नावं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget