(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis: वेळ आल्यानंतर मुफ्ती यांची साथ सोडली...शिवसेनेसोबत भावनिक युती तर, राष्ट्रवादीसोबत.... फडणवीसांनी स्पष्ट सांगितले
Devendra Fadnavis: .भाजपचा प्रवास विरोधातून सुरू होवून उपहसा कडून सर्वामान्यतेकडे गेला .जगात सर्वात मोठा पक्ष ही ओळख निर्माण झाली असल्याचे भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Devendra Fadnavis: संपर्क ते समर्थन अभियान यशस्वी होवून एक वर्षाच्या सत्ता काळात नवा सहकारी पक्षाला मिळाला.कार्यकर्त्यांना मध्ये आनंद व उत्साह आहे .भाजपचा प्रवास विरोधातून सुरू होवून उपहसा कडून सर्वामान्यतेकडे गेला .जगात सर्वात मोठा पक्ष ही ओळख निर्माण झाली असल्याचे भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. भिवंडीत भाजपच्या 'महाविजय 2024' या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीतील नवा पक्ष राष्ट्रवादीबाबतही सूचक वक्तव्य केले. तर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.
ठाकरेंकडून भाजपच्या पाठीत खंजीर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. हा खंजीर भाजपाच्या पाठीत होता. उत्तमराव ते गोपीनाथ राव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते राबले त्यांच्या पाठीत होता. अपमान सहन करू बेइमानी नाही.असंख्य कार्यकर्त्यांच्या बेइमानी होती. हा धर्म आहे अधर्म आहे. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्या शिवाय त्याला मारता येणार नाही. कृष्णाने काय काय केलं. भीष्माला हल्ला करण्यासाठी शिखंडीला समोर आणलं. अश्वथामाबाबतही 'नरो वा कुंजरोहा' ही भूमिका घ्यावी लागली. ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीती करावी लागते, असेही फडणवीस यांनी म्हटले. दोन दोन पक्ष फोडले घर फोडले असा आरोप होतो. जनाधराचा अपमान कोणी केला असा प्रश्न करताना ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येईल असे वक्तव्य ही त्यांनी केले.
वेळ आल्यानंतर पीडीपीलाही सोडलं
काश्मीरमध्ये मेहबूबा सोबत सरकार बनवून त्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. वेळ आल्यावर सत्तेला लाथ मारून बाहेर पडत तेथील 370 कलम हटवून दाखवलं. ध्येय संपलं नाही पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याचे आहे. हे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत भावनिक युती, तर राष्ट्रवादीसोबत...
शिवसेनेसोबत आपली भाजपची भावनिक युती आहे. एका विचाराने एकत्र आलो आहोत. तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे. ही राजकीय मैत्री कदाचित दहा वर्षांनी ती सुद्धा भावनिक युती होईल असेही फडणवीस यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंसोबत 2019 मध्ये काय चर्चा झाली?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. काही लोक शपथा खोट्या घेतात. मला खात्री आहे, त्यांनी नक्की म्हटले असेल राजकारणासाठी अशी खोटी शपथ घ्यावी लागते. त्यांनी मनोमन पोहरादेवीची माफी मागितली असेल आणि पोहरादेवी त्यांना माफ करो असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला. 2019 ला कोण मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरले होते आणि हा निर्णय सर्वांशी बोलून झाला होता. पण त्यांनी खंजीर खुपसला. याला बेइमानीच म्हणावी लागेल. दुसरा शब्द नाही असे फडणवीस यांनी म्हटले. पण, हा दगा, हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथजींपर्यंतच्या पाठित खुपसला गेला. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीत हा वार होता. असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणाशी, त्यागाशी झालेली ती दगाबाजी होती. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी गाळलेल्या घामाशी ती गद्दारी होती असे फडणवीस यांनी म्हटले. हम छेडते नही...छेडा तो छोडते नही...दगाबाज्यांना माफी नाहीच... हा आमच्यावर शिवरायांचा संस्कार असल्याचेही सांगत फडणवीसांनी सूचक इशाराही दिला.