एक्स्प्लोर

Sanjay Raut : भाजपकडून मैत्रीचा हात आला तर....संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं 

Sanjay Raut on Bjp : पक्ष फुटीच्या मुद्यावरुन शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर जोरदार निशाणा लगावला.

Sanjay Raut on Bjp : पक्ष फुटीच्या मुद्यावरुन शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर जोरदार निशाणा लगावला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर (Maharashtra) आघात केल्याचे राऊत म्हणाले. भाजपकडून (BJP) जर मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारणार का? असा प्रश्नही प्रसारमाध्यमांनी राऊतांना विचारला. यावेळी ते म्हणाले की,  भाजपबरोबर अजिबात हातमिळवणी करणार नाही. हे मी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगत असल्याचे राऊत म्हणाले. 

कोण तुम्हाला माफ करणार...

राजकारणामध्ये मतभेद होत असतात. काही वेळेला टोकाचे मतभेदही होतात. यापूर्वी अनेक पक्षातही झाले. आमचेही अनेकवेळा मतभेद झाले आहेत. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष फोडता आणि चोर आणि लफंगांच्या हातावर ठेवता, कोण तुम्हाला माफ करेल असेही संजय राऊत म्हणाले. 

मनसेला (MNS) शुभेच्छा देणार का? राऊत म्हणाले शिवसेना आणि बाळासेहब ठाकरे नसते तर...

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त त्यांनी शुभेच्छा देणार का? असा सवाल संजय राऊतांना प्रसारमाध्यमांनी केला. यावेली राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रात प्रमुख पदावर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासेहब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि याचं आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. मूळ शिवसेना जागेवरच आहे. 

महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण' 

शिवसेना (Shivsena) फोडून भाजपनं (BJP) मोठा गुन्हा केला आहे. राज्याची जनता या वेदना कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण' असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. हे महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेना विसरणार नसल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन भाजपने फोडला आहे.  हा महाराष्ट्र राज्यावर केलेला आघात असल्याचे राऊत म्हणाले. 

नागालँडमध्ये सहयोगी पक्षाचं सरकार, तिथं भाजपचे सरकार नाही

नागालँडमध्ये (Nagaland) भाजपचे सरकार आलेलं नाही. भाजप तिथे सहयोगी पक्ष असल्याचे संजय राऊत म्हणाले. यापूर्वी देखील नागालँडमध्ये एकत्रीत सरकारचा प्रयोग झाला होता. तिथे आता स्थानिक सरकारच्या पक्षामध्ये भाजप सामील झाल्याचे राऊत म्हणाले. एकत्रित सरकार होणं ही त्या राज्याची गरज आहे. कारण नागालँड हे एक संवेदनशील राज्य असल्याचे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण', पक्ष फुटीवरुन राऊतांचा भाजपवर 'प्रहार'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटीलDhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहितीHarshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोटCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 07 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; झिरवळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्याचं राजकारण बदलणार
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत
Embed widget