एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : भाजपचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंकडून मान्य

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्रीपद सोडा हे समोर येऊन सांगा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, मविआतून बाहेर पडण्यावर एकनाथ शिंदे ठाम. पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : भाजपचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंकडून मान्य

Background

Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप आला असून महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अन् शिवसेनेत वादळ आलं.

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये परवाचा दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत. राज्याच्या राजकारणात यापूर्वी महाराष्ट्रानं न पाहिलेल्या अनेक घडामोडी रात्रभर घडत होत्या. 

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले. 

राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरतमधून गुवाहाटीकडे

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं केंद्र आता सूरतमधून आसाममधल्या गुवाहाटीकडे पोहोचलं. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह काल (बुधवारी) सकाळी गुवाहाटीमध्ये पोहोचले. काल दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाच्या आमदारांना विशेष विमानानं सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलं. गुवाहाटीमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे बंडानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेत असल्याचं सांगत त्यांनी भाजपबरोबर जाणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत. सूरतमध्ये भाजपचे मोहीत कंबोज हे एकनाथ शिंदेच्या समर्थक आमदारांसोबत सावलीसारखे वावरत होते. एवढंच नाहीतर सूरतपासून गुवाहाटीपर्यंत या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे मोठे नेते उपस्थित असल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवधनुष्याची साथ सोडत भाजपचं कमळ हाती तर घेणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही, असा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. अशातच सूरतहून गुवाहाटीला गेलेल्या या सर्व आमदारांचा मुक्काम आता गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये झाला आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्याचं लक्ष गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलकडे असणार आहे. 

एकनाथ शिंदे नवा गट स्थापन करणार? 

एकनाथ शिंदेंची पुढची भूमिका काय असणार हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. शिवसेनेसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण असल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. अशातच, बंडं केलं नाही असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी नवा गट स्थापन करण्यासाठी हालचाली केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंना पाहिजे असलेला 37 आमदारांचा  कोटा पुर्ण झाल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी गट स्थापनेसाठी सह्या केल्याचं दिसून आलं आहे. तशा सह्या करत असतानाचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. शिंदेंना गट स्थापन करण्यासाठी 37 आमदारांची गरज होती आणि त्या सर्व आमदारांच्या सह्या घेण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली होती. त्याला शिंदेंच्या गटातील आमदारांनीही दुजोरा दिला. 

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार : एकनाथ शिंदे 

गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत." तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  

एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील सत्ता संघर्षावर काल (बुधवारी) मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. "मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. परंतु, ज्यांना मी मुख्यमंत्रीपदी नको आहे  त्यांनी समोर येऊन सांगा, मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. शिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे, मी पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यावेळी त्यांनी आपण राजीनामा द्यायाल तयार आहे, पण समोर येऊन सांगा. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदर होईल असं म्हटले आहेत.  

उद्धव ठाकरे म्हणाले, " मी संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे आव्हानांना तोडं द्यायला मी तयार आहे. त्यामुळे सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी पद सोडले असते. सुरतला गेलेल्या एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करतो. मला फोनवरून देखील सांगतीले की, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, तर आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवण्यास  तयार आहे, मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसैनिकांचं भक्तिप्रदर्शन

त्यानंतर बोलताना त्यांनी आजच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर त्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं आणि मातोश्रीवर आपला मुक्काम हलवला. वर्षा निवासस्थानापासून मातोश्रीपर्यंत ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता, त्यावेळी शिवसैनिकांनी साद घातली. मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी शिवसैनिकांची गर्दी जमली होती. शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. 

शिवसैनिक भरडला गेला, उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला

 महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सुनावले होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेय. एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्थाव धुडकावत परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 

ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं?

1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचं मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 
3. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाला नवं वळण

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळी वळणं लागत आहेत. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख माघारी परतले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे या वादाला आता नवे वळण लागणार आहे.

ती स्वाक्षरी माझी नाही, बोगस आहे : आमदार नितीन देशमुख

शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आपली स्वाक्षरी इंग्रजीत असून त्या पत्रावर बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरीलसही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेच्या गॅझेटियरमध्ये आमदार नितीन देशमुखांचं नाव 'नितिन भिकनराव टाले' असं आहे. या पत्रावरील देशमुखांची सही 'नितीन देशमुख' अशी मराठीत असल्याचं दिसत आहे. त्यांना नितीन देशमुख या नावानं ओळखलं जातं. 

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.

18:06 PM (IST)  •  23 Jun 2022

Aurangabad: शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत जिल्ह्यात परतले; शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत

Maharashtra Political Crisis: गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत आपल्या जिल्ह्यात परतले आहे. त्यांनतर ते आपल्या मतदारसंघात जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याच्या बातम्या समोर आल्यावर सुरवातीला आमदार राजपूत यांचे नाव सुद्धा बंडाच्या यादीत येत होते. मात्र आपण मुंबईतच असल्याचा खुलासा त्यांनी केल्याने चर्चेवर पडदा पडला. तर आज औरंगाबाद विमानतळावर येताच शिवसैनिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे सुद्धा उपस्थित होते.

16:04 PM (IST)  •  23 Jun 2022

Eknath Shinde : शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंची नेते पदी निवड

Eknath Shinde : शिंदेसेनेनं बैठकीत नेते पदाचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावावर सर्व आमदारांनी मिळून एकनाथ शिंदे यांची निवड केली आहेत

15:14 PM (IST)  •  23 Jun 2022

Maharashtra Political Crisis : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत

14:54 PM (IST)  •  23 Jun 2022

आमदार संजय राठोड अद्यापही मुंबईतच, काय निर्णय घ्यावा या संभ्रमात आमदार संजय राठोड

आमदार संजय राठोड अद्यापही मुंबईतच, संजय राठोड गुवाहाटीला गेलेच नाहीत आणि मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतही गेले नाही.. संजय राठोड यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्याने ते मुंबईत असल्याची सूत्रांची माहिती . काय निर्णय घ्यावा या संभ्रमात आमदार संजय राठोड.. आज सायंकाळपर्यंत आमदार संजय राठोड महंत, पदाधिकारी, शिवसैनिकांशी चर्चा करून निर्णय घेतील अशी ही माहिती मिळतेय..मुख्यमंत्री यांनी ही सगळ्यांची भावना समजून घ्यावी आणि एकनाथ शिंदे यांनी ही एक पाऊल मागे यावं अशी संजय राठोड यांची भावना असल्याचं सूत्रांनी सांगितले.. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंताचा ही राठोड यांच्यावर दबाव.. समाजाचा हित पाहून निर्णय घ्यावा अशी त्यांची संजय राठोडकडे मागणी..

14:49 PM (IST)  •  23 Jun 2022

मविआतून बाहेर पडण्याची इच्छा मुंबईत येऊन बोलून दाखवा, 24 तासांत परत या : संजय राऊत

14:28 PM (IST)  •  23 Jun 2022

Eknath Shinde : ईडी आणि भाजपच्या धास्तीने ठाणेकर एकनाथ शिंदे "बंडवीर"? सोशल मीडियातील व्हायरल पोस्टची चांगलीच चर्चा

ईडी आणि भाजपच्या धास्तीने ठाणेकर एकनाथ शिंदे 'बंडवीर'? सोशल मीडियातील व्हायरल पोस्टची चर्चा

एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मीडियामध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप आणि ईडीच्या धास्तीने बंडाचा पवित्रा घेतला आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

14:28 PM (IST)  •  23 Jun 2022

Eknath Shinde : गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर, जाणून घ्या किती आमदारसोबत?

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर, जाणून घ्या किती आमदारसोबत?

Maharashtra Political Crisis Eknath Shinde : गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आज शक्तिप्रदर्शन केले. शिंदे गटाकडे अपक्षांसह एकूण 42 आमदार असल्याचे समोर आले आहे.

13:49 PM (IST)  •  23 Jun 2022

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल : नाना पटोले

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे की, "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असण्याबाबत काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल."

13:37 PM (IST)  •  23 Jun 2022

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी सांगलीत शिवसैनिक उतरले रस्त्यावर

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने या आव्हानाला सामोरे जाऊ. शिवसेनेचे आमदार कुठेही जाणार नाहीत. ते परत येतील, बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेनेला त्रास देणारे कोण आहेत त्याची जाणीव असलेले नेत्यांनी योग्य भूमिका घ्यावी उध्दवजी योग्य तोडगा काढतील असे उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर यावेळी म्हणाले. यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Pragya Mishra : ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
Pankaja Munde: 32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
MAHARERA:  पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Revati Sule Baramati Lok Sabha : आईसाठी कायपण! Supriya Sule यांच्या प्रचारासाठी लेक रस्त्यावरRohini Khadse On Raksha Khadse : परिवार म्हणून वहिनींना शुभेच्छा! मी शरद पवारंसोबतच : रोहिणी खडसेRaksha Khadse Loksabha : हात जोडले, डोक टेकलं;रक्षा खडसेंनी घेतले एकनाथ खडसेंचे आशीर्वाद : ABP MajhaSanjay kaka Patil on Vishal Patil : यंदा विशाल पाटलांचा पराभव करुन हॅटट्रिक करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Pragya Mishra : ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
Pankaja Munde: 32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
MAHARERA:  पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
Embed widget