Raj Thackeray : ठाण्यात राज ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार?
राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतील त्यांच्या वक्तव्याचे अजूनही पडसाद उमटत आहेत. आता ठाण्यात लगेचच दुसरी सभा होत असल्यामुळे आता राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली आणि त्यांचे परिणाम अजूनही जाणवत आहे. त्यातच आता उद्या ठाण्यात मनसेचे लगेचच दुसरी जंगी सभा पार पडत आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यामुळें आता या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलू शकतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतील त्यांच्या वक्तव्याचे अजूनही पडसाद उमटत आहेत. काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले आहेत. अशातच आता उद्या ठाण्यात लगेचच दुसरी सभा होत असल्यामुळे आता राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शरद पवार यांनी ठाकरेंवर टीका करताना एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं. त्यामुळे हाच गैरसमज खोटा ठरवण्याची तयारी केल्याचे लगेच जाहीर झालेल्या ठाण्याच्या सभेवरून दिसत आहे. त्यामुळेच ठाण्यात उत्तर सभा असे ठीक ठिकाणी बोर्ड लावण्यात आले आहेत
यासोबतच ठाण्यात मोठं मोठ्या एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत म्हणजेच एकेकाळी 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून मोदींची पोलखोल करण्याचा प्रयत्न राज यांनी केला होता. तो प्रयोग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या बाबत तर राज ठाकरे करणार का अशी देखील चर्चा रंगू लागली आहे.
#उत्तरसभा pic.twitter.com/7HCIZPujpS
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 11, 2022
राज ठाकरे मुंबईतील आपल्या सभेनंतर राजकीय पातळीवर पुन्हा एकदा महत्वाचे स्थान घेण्याची संधी मिळत असताना विरोधकांकडून केली जाणारी टीका खरी होऊ नये याची काळजी घेताना दिसत आहेत त्यामुळेच आपण ठाण्यात नेमकं काय बोलणार याचा टिझर देखील नुकताच मनसेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे,
राज ठाकरे उद्या शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांना लक्ष्य करणार हे टीझरवरून स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे आगामी काळात मनसे भाजप राजकीय सहकार्य जुळवताना भाजप प्रमाणे मनसे देखील सतत कार्यरत असणारा आणि राजकीय वातावरण निर्मितीच्या बाबतीत दक्ष पक्ष आहे. ही इमेज तयार करण्याचा प्रयत्न राज ठाकरेकडून होताना पाहिला मिळतं आहे
मनसेसाठी ठाण्याचं राजकीय महत्त्व
- मुंबईबरोबरच सेनेचा तीन दशकं बालेकिल्ला
- सेना भाजप मुख्य लढत असली तरी मनसेला या संघर्षात वाव मिळू शकतो
- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला लाखाहून अधिक मते
- मनसेमुळे मुंबईसह ठाण्यात देखील सेना उमेदवार पराभूत होऊ शकतो
- मशीद - भोंगे या आक्रमक हिंदुत्वाच्या आधारे सेनेला मानणारा हिंदू वर्ग तोडून मनसेला जोडता येऊ शकतो
राज ठाकरेंच्या उद्या ठाण्यातील सभेचे परिणाम आपोआप शेजारील कल्याण- डोंबिवली व नवी मुंबईत होणार असा कायास मनसेने बांधला आहे. त्यामुळेच मुंबईच्या परिघावरील भागात शिवसेनेसमोरं आव्हानं उभे करण्यासाठी मनसेने ठाण्याची निवड केली आहे. या रणनीतीचा मनसेला कितपत फायदा होणार हे आगामी निवडणुकांमध्ये लवकरच स्पष्ट होणार आहे.