(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सेल्फी काढणं जीवावर बेतलं, हरिहरेश्वर येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू
समुद्रात सेल्फी काढताना एक पर्यटक अचानक बुडू लागला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने पाण्यात उडी मारली आणि तोही बुडाला.
हरिहरेश्वर : उंचावर, टेकडीवर किंवा बोटीत जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा घटनांमधून कोणताही बोध न घेत अनेकदा तरुणाई बिनधास्तपणे स्टंटबाजी करत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणतीही काळजी न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ त्यांच्यावर येते. असाच प्रकर हरिहरेश्वर येथे घडला आहे. फोटो काढत असताना महिला पर्यटक लाटाच्या जोरदार फटक्यामुळे समुद्रात पडली. समुद्रात पडलेल्या महिला पर्यटकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यटकांने पाण्यात उडी घेतली. महिला पर्यटकास वाचविण्यात तालुका प्रशासनास यश आले मात्र पुरुष पर्यटकास त्याच्या प्राणास मुकावे लागले
मिळालेल्या माहितीनुसार विकास रामचंद्र काळे (वय 53) आणि मनिषा जयेश मेटे-दळे (वय 49) हे पुण्यातील पर्यटक मौजमजेसाठी हरिहरेश्वर येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले. पोहण्यासाठी गेलेल्या मनिषा मेटेदळे यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यामध्ये मनिषा मेटेदळे ह्या समुद्रामध्ये बुडू लागल्या त्यांना वाचवण्यासाठी विकास काळे यांनी पाण्याचा अंदाज न घेता समुद्रात उडी मारली संध्याकाळी चार वाजता समुद्राला भरती आली असता पाण्याचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात दोघेही बुडाले.
पाण्यात बुडालेल्या दोघांपैकी मनिषा जयेश मेटेदळे यांना प्रशासनाच्या व साळुंके रेस्क्यू टीम श्रीवर्धन यांच्या प्रयत्नाने वाचविण्यात यश आले. यावेळी समुद्राला मोठे उधाण आल्याने स्थानिक कोळी बांधवांच्या बोटी घटनास्थळी पोहोचू शकल्या नाही. स्थानिक प्रशासन व एन डी आर एफ साळुंके रेस्क्यू टीम श्रीवर्धन यांनी प्रशासनाच्या सूचना मिळताच श्रीवर्धन किनाऱ्यावरून तातडीने अवघ्या नऊ मिनिटात हरिहरेश्वर गाठून सदर महिलेचे प्राण वाचविले. तर विकास रामचंद्र काळे यांचा बुडून मृत्यू झाला. काही वेळातच विकास काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साळुंखे रेस्क्यू टीम श्रीवर्धन यांनी रेस्क्यू करून सदर महिलेचे प्राण वाचविले. संबंधित अपघाताचा तपास श्रीवर्धन पोलीस करीत आहेत.
संबंधित बातम्या :