ऐकावे ते नवल! बांधावरचा वाद, थेट 100 स्थळांना धमकी
एकाच आठवड्यात राज्यातील दोन मोठ्या मंदिराला धमकी मिळाल्याने मंदिर प्रशासनासोबतच पोलिस प्रशासन सुद्धा हादरले आहे. दोन्ही मंदिराला दिलेल्या धमकीचे पत्र एकाच व्यक्तीने लिहिले आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील ज्योतिर्लिंग आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर उडवून देण्याचे धमकी पत्र बीड पोलिसांना मिळाले. ज्यामध्ये मंदिर व्यवस्थानास पन्नास लाख रुपयांची खंडणी द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवून देऊ या आशयाचे पत्र नांदेड येथील विष्णुपुरी येथील रहिवाशी रातनसिंग दक्खने, व्यंकट गुरपत मठपती व प्रभाकर पुंड यांच्या नावे मंदिरास आले होते. परंतु तपासाअंती वेगळाच प्रकार समोर आला आहे. फक्त या दोन मंदिरांना नाही तर आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्थळांना धमकीचे पत्र देण्यात आले आहे.
एकाच आठवड्यात या दोन मोठ्या मंदिराला धमकी मिळाल्याने मंदिर प्रशासनासोबतच पोलिस प्रशासन सुद्धा हादरले आहे. दोन्ही मंदिराला दिलेल्या धमकीचे पत्र एकाच व्यक्तीने लिहिले आहे. कारण या दोन्ही पत्रातील हस्ताक्षर हे सारखेच आहे विशेष म्हणजे या दोन्ही पत्रातील मजकूर सुद्धा सारखाच आहे एवढेच नाही तर या दोन्ही मंदिराला जिथून हे पत्र पाठवण्यात आले तिथला पत्ता सुद्धा सारखाच आहे. फरक एवढाच की दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे. या धमकी सत्राच्या मागचे कारण सुद्धा तितकेच गंभीर आहे.
नांदेड येथील सिडको परिसरातील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक असणाऱ्या नंदकुमार डिगांबर बालुरे या शिक्षकाने उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंग रामसिंग दक्खने यांना विक्री केली. पण याच शेतीच्या व पैशाच्या वादातून नंतर दोघांचे खटके उडाले व वितुष्ट आले. सदर वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास गुरुजींनी सुरुवात केली. ज्यात कोणाचाही मृत्यू झाला अथवा आत्महत्या झाली तर त्यात रातनसिंग यांचे नावे घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा नंदकुमार बालुरे गुरुजींनी लावला. ज्यात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस, नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस नांदेड, मांडवी, किनवट पोलीस, परळी वैजनाथ मंदिर,अंबाजोगाई मंदिरास पत्र व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. तर यापत्रातील अक्षर व पत्र हे नंदकुमार बालुरे यांचे नसल्याचा निर्वाळा बालुरे यांच्या शाळेने केला आहे.
एका छोट्याशा जमिनीच्या या वादातून सुरू झालेले हे धमकी सत्र 2016 पासून फक्त कोरोना काळात ही धमकी सत्र थांबले होते. मात्र आतातरी केवळ स्वतःच्या भांडणासाठी संपूर्ण यंत्रणेला धारेवर धरणाऱ्या या व्यक्तीला आवरणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा असे एखादे पत्र येईल आणि प्रशासन खडबडून जागे होईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी
शेअर बाजार सावरतोय! दिवसाखेर शेअर बाजार 153 अंकांनी वधारून बंद
10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती