Sanjay Raut : सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, पण आम्ही क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार, हाच का तुमचा राष्ट्रवाद? संजय राऊतांचा भाजपला सवाल
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले. भाजपचा राष्ट्रवाद खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशिया कप 2025 (Asia Cup 2025) च्या अंतिम सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 महिलांचे कुंकू पुसले, त्यानंतर आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवले. सीमेवर रक्ताची नदी वाहू देत, पण आम्ही क्रिकेट खेळू आणि पैसा कमवू. आता राष्ट्रवाद (Nationalism) कुठे गेला? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
हा सामना काही मोठा नाही, पण या वातावरणात भारत-पाक सामना (IND vs PAK Final) खेळणे ही अत्यंत घृणास्पद बाब आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्याला विरोध केला आहे.
Sanjay Raut On Ind Vs Pak : राष्ट्रवाद कुठे गेला?’
संजय राऊत यांनी उरी, पुलवामा आणि पहलगावमधील दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत म्हटले की, “या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध लोकांचा बळी गेला. 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले. तरीसुद्धा जर आपण पाकिस्तानसोबत सामना खेळणार असू, तर राष्ट्रवाद कुठे गेला? भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? राष्ट्रभक्ती कुठे गेली? हे सगळं खोटं आहे.”
#WATCH | Mumbai, Maharashtra: India to take on Pakistan in the final match of the Asia Cup 2025 today. Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "This is not the biggest match; it is very bad for India and Pakistan to play a match in such an environment... When it comes to terrorism,… pic.twitter.com/Mk5Bf8nSDw
— ANI (@ANI) September 28, 2025
Sanjay Raut On BJP : क्रिकेटमध्ये पैशाचा मोठा खेळ
संजय राऊत म्हणाले की, “जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही, तर काहीही होणार नाही. पण इथे सट्टा आणि कमाईच्या पैशाचा मोठा खेळ आहे. BCCI आणि PCB या दोघांनाही यापासून मोठा पैसा मिळतो. मग सीमेवर रक्त वाहो, आपण क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार. मात्र या वेळी देशाची भावना प्रखर आहे. लोक टीव्हीवरदेखील हा सामना पाहू इच्छित नाहीत.”
ही बातमी वाचा:























