एक्स्प्लोर

Jalgaon SSC Exam : बापानं मुलाला मराठीची कॉपी पुरवली, पोलिसांनी मात्र धू धू धुतला, व्हिडीओ व्हायरल 

Jalgaon SSC Exam : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथील परीक्षा केंद्रावरील व्हिडीओ असल्याचे समजते.

Jalgaon SSC Exam : महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून (Maharashtra Education Board) राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच यंदा राज्यात कॉपीमुक्त अभियान (Copy Free Campaign) राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पेपर फुटल्याचा आणि कॉपीकेसचे (Copy case) प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली. अशातच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला असून यात एक पालक आपल्या पाल्याला कॉपी पुरवत असताना पोलिसांनी धू धू धुतला आहे. 

गेल्या आठवडाभरापासून बारावीच्या (HSC Exam) परीक्षा सुरु झाल्या आहेत तर दहावीच्या परीक्षा (SSC Exam) नुकत्याच सुरु झाल्या आहेत. राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून यंदा कॉपीमुक्त अभियान राबविले जाते आहे. त्या दृष्टीने राज्यभरातील केंद्रावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हिडीओ चित्रीकरण असेल, सीसीटीव्ही असे, स्ट्रॉंग रूम असेल असा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कॉपी केस घडू नये यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून पथकाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरीकडे नुकताच एक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात एका पालकाला परीक्षा केंद्रावरील पोलीसांकडून चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथील परीक्षा केंद्रावरील व्हिडीओ असल्याचे समजते. नूतन ज्ञानमंदिर विद्यालय येथे दहावीच्या परीक्षांसाठीचे केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा सुरु असताना कॉपी पुरविण्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. खरंतर राज्यभरात परीक्षा काळात केंद्रापासून 100 मीटर अंतर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मात्र या विद्यालयात परीक्षा सुरु असताना आपल्या पाल्याला कॉपी पुरविण्यासाठी एक पालक परीक्षा केंद्राजवळ दिसून आला. यावेळी पोलिसांच्या निदर्शनास ही बाब येताच कॉपी पुरवायला जाणाऱ्या एका पाल्याला पोलिसांनी बेदम चोप दिला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडल्यावर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाल्याला पोलिसांनी पोलिसांच्या काठीनेच चोप दिला आहे. उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे सोशल मिडियासह जळगावमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल.... 

दरम्यान परीक्षा सुरु झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे 100 मीटर परिसरात कुणालाच यायला परवानगी नव्हती. अशा स्थितीत परीक्षेला आलेल्या एका पाल्याला कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या एका पालकाला पोलिसांनी बघितले. सुरुवातीला या पालकाला  पोलिसांनी हटकले होते. मात्र तरीही कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पालक कॉपी घेऊन प्रतिबंधित क्षेत्रात जाताच पोलिसांनी पोलिस काठीने चोप दिला. अशावेळी संबंधित पालक पळण्याच्या प्रयत्नात ते जमिनीवर कोसळले देखील, मात्र त्याच स्थितीत पोलीस काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. मारहाण करणारा पोलिस अधिकारी हा जळगाव पोलिस दलातील असून गणेश बुवा असे त्यांचे नाव आहे. अडावद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर ते कार्यरत आहे. याबाबत वरिष्ठ पोलिसांनी कुठलीही भूमिका घेतली नसून याबाबत कुठलीही कारवाई केल्याचे समोर आलेले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटीलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊतRaj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
×
Embed widget