एक्स्प्लोर

Nashik Accident : दुर्दैवी! मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Nashik Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात झाला आहे.

Nashik Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) इगतपुरीजवळ भीषण अपघात (Major Accident) झाला आहे. दोन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका लहान मुलीचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असून मुंबई आग्रा महामार्ग (Mumbai Agra Highway) मृत्यूचा सापळा बनला आहे. अशातच आज दुपारी चार वाजेच्या सुमारास इगतपुरीतील (Igtapuri) पंढरपुरवाडी समोर नाशिकहून (Nashik) मुंबईकडे (Mumbai) जाणारी अॅसेंट कार ही गाडी भरधाव वेगाने जात होती. परंतु, त्याचवेळी गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार उडून थेट मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण दगावले असून यात एका लहान मुलीचा समावेश आहे. 

इगतपुरी शहराजवळील पंढरपुरवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. गाडी आदळल्यानंतर एकच आवाज झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या अनेकांच्या काळजात धस्स झाला. दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे भरधाव  वेगाने जात असताना गाडीचा पुढील टायर फुटल्याने कार दुसऱ्या बाजूने  मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी, एक महिला व दोन पुरुष असा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी (injured) झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. 

तसेच या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलिसांनी (Police) सुरु केला आहे. तर या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली. दरम्यान इगतपुरी जवळ पंढरपूर वाडी समोर महामार्गावरच सर्वत्र गाडीच्या काचा आणि रक्तबंबाळ अवस्थेत अपघातग्रस्तांना पाहून अपघातस्थळी असलेल्या नागरिकांच्या अंगाला काटा आला. या भयंकर अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे या जखमी असलेल्या अपघातग्रस्ताला एका खाजगी रुग्णालयात उपचार करिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEOABP Majha Headlines : 11 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सGanga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special ReportZero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : वाहतूक कोंडी,पार्किंग ते धुळीचं साम्राज्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Embed widget