Latur News: दुचाकीवरून तब्बल सहा जणांचा प्रवास; अपघात होताच चार जागीच ठार
Latur News: विशेष म्हणजे अपघातापूर्वी या सहा जणांचा दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Latur News: लातूर जिल्ह्यात (Latur District) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दुचाकीवरून चक्क सहा जण प्रवास करत असताना त्यांना भरधाव पिकअप टेम्पाने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सहा पैकी चार जण जागीच ठार झाले आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विशेष म्हणजे अपघातापूर्वी दुचाकीवरून या सहा जणांचा प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मृतांमध्ये विलास प्रकाश आडे (वय 40 वर्षे), आकश प्रकाश आडे (वय 35 वर्षे), शंकर विकास आडे (वय 4 वर्षे), वैशाली विकास आडे (वय 6) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरच्या रेणापूर तालुक्यातील नाईकनगर, जवळगा तांडा येथील विलास प्रकाश आडे (वय 40 वर्षे), आकश प्रकाश आडे (वय 35 वर्षे), शंकर विकास आडे (वय 4 वर्षे), वैशाली विकास आडे (वय 6 वर्षे), शशिकला प्रकाश आडे (वय 55 वर्षे) आणि जान्वी विकास आडे (वय 12 वर्षे) असे सहा जण एकाच दुचाकीवरून (एमएच.24 वाय 4399) प्रवास करत होते. हे दुचाकीस्वार लातूर येथून कळंबच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान रात्री 11 वाजेच्या सुमारास हे दुचाकीस्वार जोडजवळा गावाजवळ आले. याचवेळी कळंब येथून लातूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव टेम्पोने (एमएच 25 एजे 5053) या दुचाकीला जोराची धडक दिली.
चौघांचा मृत्यू...
दरम्यान भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिल्याने, या भीषण अपघातात सहा जण दुचाकीवरून उडून जोरात रस्त्यावर फेकले गेले. ज्यात सहा पैकी चार जण जागीच ठार झाले. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विलास प्रकाश आडे (वय 40 वर्षे), आकश प्रकाश आडे (वय 35 वर्षे), शंकर विकास आडे (वय 4 वर्षे), वैशाली विकास आडे (वय 6) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये शशिकला प्रकाश आडे आणि जान्वी विकास आडे यांचा समावेश आहे.
दुचाकीवरून सहा जण प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल..
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लातूर-कळंब महामार्गावरून एकाच दुचाकीवरून सहा जण प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अन्य वाहनधारकांना याबाबत कुतूहल वाटत असल्याने त्यांनी त्याचा व्हिडीओ केला. दरम्यान हाच व्हिडीओ अपघातानंतर सोशल मीडियात व्हायरल झाला. ज्यात दुचाकीवरून एकाच कुटुंबातील तिघे मोठे आणि तीन लहान मुले प्रवास करताना व्हिडीओत दिसत आहे. मात्र हाच प्रवास त्यांच्या जिवावर बेतला आहे. तर या घटनेने नाईकनगर तांड्यावर शोककळा पसरली आहे. तसेच मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Latur News: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या