मोठी बातमी: धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Shiv Sena Symbol: मनसेतील प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
![मोठी बातमी: धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन maharashtra News Mumbai News Do not comment on Shiv Sena Symbol Raj Thackeray appeal to party workers मोठी बातमी: धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/0955eff24d82d6db802b924d322a2248_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Sena Symbol: शिंदे गटात आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. याबरोबरच दोन्ही गटाला शिवसेना नावही वापरता येणार नसल्याचं म्हटले आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर दुसरीकडे धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तर पक्षातील प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असतांना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे. कारण मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी खुद्द मुख्य प्रवक्त्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या आहेत. तर व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रत्येकाला कळवण्यात आले आहे की, या सर्व प्रकरणावर कोणतेही प्रतिक्रिया देऊ नयेत.
निवडणूक आयोगाच्या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच मनसेच्या नेत्यांकडून यावर अनेक प्रतिक्रिया येतांना पाहायला मिळत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह प्रकाश महाजन, संदीप देशपांडे आणि गजानन काळे यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर याचवेळी, 'संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही, म्हणणाऱ्यांचं नावही संपलं' अशी खोचक टीकाही मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र आता खुद्द राज ठाकरे यांनी याप्रकरणी कोणतेही प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन केले आहे.
मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया...
राजू पाटील: मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. त्यांची जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती, तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती, असं त्ये म्हणाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे गटाला टोमणा लगावत म्हटले की, असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही.
प्रकाश महाजन: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंना निश्चितच दु:ख झालं असेल, ते शेरदील आदमी आहेत. उमदा माणूस आहे. मात्र या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांच्याकडून करण्यात आला आहे.
संदीप देशपांडे: मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, ''संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्ह ही.'' असं त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
गजानन काळे: यावर मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी देखील ट्वीट करत म्हटले आहे की, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही. ''आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीचं घड्याळ, नाहीतर अबू आझमीच्या सायकलचाच आधार आहे. संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा.'
महत्वाच्या बातम्या...
Shiv Sena Symbol: राज ठाकरेंनाही 'या' निर्णयाचा दुःख झालं असेल; प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया
संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही, म्हणणाऱ्यांचं नावही संपलं, ठाकरे गटाला मनसेचा टोला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)