संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही, म्हणणाऱ्यांचं नावही संपलं, ठाकरे गटाला मनसेचा टोला
MNS Reaction On Shiv Sena Symbol News: शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं असून ठाकरे आणि शिंदे गटाला आता शिवसेनेच नाव देखील वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यावर अनेक राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया देत आहे.
MNS Reaction On Shiv Sena Symbol News: शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं असून ठाकरे आणि शिंदे गटाला आता शिवसेनेच नाव देखील वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यावर अनेक राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया देत आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर आता मनसे नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत म्हटलं आहे की, ''संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्ह ही.'' असं ते ट्वीट करत म्हटले आहे.
संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचा नाव ही संपलं आणि चिन्ह ही कालाय तस्मै नमः ।
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 8, 2022
आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही: राजू पाटील
मनसे आमदार यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीट करून म्हणाले आहेत की, बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. त्यांची जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती, तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती, असं त्ये म्हणाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे गटाला टोमणा लगावत म्हटले की, असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही.
आमची निशाणी 🚂
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 8, 2022
बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. ‘त्यांची’ जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती.असो,तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही. @AUThackeray #मनसे #MNS
शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच्या घड्याळाचा आधार: गजानन काळे
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी देखील उद्धव ठाकरे गटाला लक्ष केलं आहे. काळे ट्वीट करत म्हटले आहे की, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही. ते पुढे म्हणाले, ''आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीचं घड्याळ, नाहीतर अबू आझमीच्या सायकलचाच आधार आहे. संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा.''
धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही ...
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 8, 2022
आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादी च "घड्याळ"नाहीतर अबू आझमी च्या "सायकल"चाच आधार आहे ...
संपलेल्या पक्षा बद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा ...
संबंधित बातम्या: