Latur Viral Video : मंदिरात नंदी दूध पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा सिद्ध करणाऱ्याला अंनिसकडून 21 लाख रुपयांचं बक्षीस
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
BMC Covid Scam: कथित BMC कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरण
आरोपी सुजीत पाटकर यांच्या ईडी कोठडीत 1 ऑगस्टपर्यंत वाढ
मात्र पाटकरांना आवश्यक असलेली औषधं देण्याचे ईडीला निर्देश
चौकशी दरम्यान पाटकरांच्या वकीलाला सोबत राहण्याची मुभा
तर सहआरोपी डॉ. किशोर बिसुरे यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
पावसाळी अधिवेशन गुंडाळणार नाही, अधिवेशन पूर्ण काळ चालणार अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. फक्त येत्या सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी असणार आहे असं सांगितलं आहे.
बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र Read More
Manipur Horror : मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उमटली आहे. देशातील महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शहरात बुधवारी (26 जुलै) निषेध मोर्चा काढण्यात आला होता. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात आमदार सत्यजित तांबे यांची नऊ वर्षांची मुलगी अहिल्याने देखील आजी दुर्गा तांबे यांच्यासमवेत मोर्चात सहभागी होत मणिपूर घटनेचा निषेध नोंदवला.
Nagpur News : समृद्धी महामार्ग निर्मिती दरम्यान गौण खनिजाची चोरी करणाऱ्या कंत्रादारांवर महसूल विभागाने ठोठावलेल्या दंडाला रद्द करणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. 3 जानेवारी 2023 रोजी महसूल मंत्रालयाने एक शासन आदेश काढून सर्व कंत्राटदारांवरची दंड वसुलीची तहसीलदारांची कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्या राज्य सरकारच्या आदेशाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. गौण खनिजाच्या चोरी प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्यात वेगवेगळ्या विभागात संबंधित कंत्राटदारावर महसूल विभागाने कोट्यवधींचा दंड ठोठावला होता. एकट्या नागपूर विभागात समृद्धीच्या गौण खनिज चोरीचा महसुली आकडा हा 489 कोटींचा आहे. राज्यातील इतर भाग पकडून हा आकडा एक हजार कोटी रुपयांच्या वर असण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -