एक्स्प्लोर

Kolhapur News: घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, आजरा तालुक्यातील किणे गावातील घटना 

Kolhapur News: आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा मृत्यू झाला.

Kolhapur News: कोल्हापूर शहरातील (Kolhapur Rain Update) ऐतिहासिक खासबाग मैदानाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पती अर्जुन गुडुळकर देखील जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या पती आणि नणंद यांना उपचारासाठी नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची घटनेची माहिती समजल्यानंतर तहसिलदार समीर माने, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.  

महिलेचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू

दुसरीकडे, कोल्हापुरात (Kolhapur Rain Update) खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. नाटक पाहण्यासाठी आलेल्या दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. नंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. पण त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. अश्विनी यादव असे मृत महिलेचे नाव असून संध्या तेली ही महिला जखमी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले.

दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्या

दरम्यान, संध्या तेली या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून द्यावी, त्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांना दिले. जखमी तेली यांच्या प्रकृतीची विचारपूस दवाखान्यात जावून भाजप शिष्टमंडळाने केली. जखमी तेली यांचा उपचारांचा खर्च करण्यासाठी शासनाच्या योजनेतून निधी उपलब्ध करून देऊ. मात्र शासकीय योजनेतून निधी मिळाला नाही तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी तेली कुटुंबियांना दिले.

इतर महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Embed widget