मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे, मीडियापासून व कामातून दूर दिसलेले धनजंय मुंडे आता कामात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
धनंजय मुंडेंनी माजी मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. तसेच, भुजबळ यांनी अनेक वर्षे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम केलेले असल्याने या खात्यातील कामकाजासंबंधी त्यांनी मार्गदर्शनही केल्याचे मुंडे यांनी म्हटलं आहे.

अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात विभागाच्या सचिव जयश्री भोज, शिधावाटप मुंबई विभागाचे मुख्य नियंत्रक सुधाकर तेलंग व अन्य अधिकाऱ्यां सोबत कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवलेल्या शंभर दिवसाचा कार्यक्रम 100% यशस्वी करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली.
मंत्रालयात भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांची कामे समजावून घेत त्यांचा निपटारा करण्यासाठी संबंधितांना सूचना केल्याचेही मुंडेंनी म्हटले आहे.
दरम्यान, सोशल मीडियातूनही गेली काही दिवस दूर असलेले धनंजय मुंडे आज सोशल मिडिया अकाऊंटवर एक्टीव्ह दिसून आले. त्यांनी मंत्रालयातील भेटीगाठीचे फोटोही शेअर केले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे कामात अॅक्टीव्ह झाले असून राजीनाम्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.