एक्स्प्लोर

Pune Crime News : कबुतर चोरलं म्हणून टोळीने अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्टा; पुण्यातील प्रकार

कबुतर चोरले म्हणून टोळक्याने हत्यार फिरवत माजवली दहशत आणि अल्पवयीन मुलाला त्याच कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केलं आहे.

Pune Crime News : कबुतर चोरले म्हणून टोळक्याने (Pune Crime News) हत्यार फिरवत माजवली दहशत आणि अल्पवयीन मुलाला त्याच कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केलं आहे. पुण्यातील कात्रज भागात घृणास्पद कृत्य समोर आलं आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे सध्या चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. 

गणेश दोडमणी, ओम पंडित, अमोल आदम या तरुणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कात्रज भागात 25 जुलै रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने आरोपींच्या जागेवरून कबुतर चोरले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी कात्रज भागात हत्यार घेऊन दहशत माजवली. 

"कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही"

"कोणी मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकेल", अशी धमकी देत या तरुणांनी हैदोस घातला. त्या अल्पवयीन मुलाला शोधून त्याला गाडीवर घेऊन एका ठिकाणी नेले आणि त्याला त्या ठिकाणी कबुतराची विष्टा खाऊ घातली. जर हे कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी या आरोपींनी त्याला दिली. घडलेला सगळा प्रकार अल्पवयीन मुलाने जेव्हा वडिलांना येऊन सांगितला तेव्हा त्यांनी पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.

धिंड काढूनही दहशत कायम...

पुण्यात मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगकडून दहशत माजवली जात आहे. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पोलिसांकडून या विविध टोळीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. टोळीची धिंडही काढण्यात येते मात्र याचा काहीही परिणाम या टोळीवर होताना दिसत नाही आहे,. त्याउलट या टोळीचा धुमाकूळच वाढताना दिसत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पुण्याच्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्याच मित्राकडून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. त्या घटनेनं पुण्याचं पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं. आता तुम्ही हातात कोयता घ्याच, मग आम्ही तुम्हाला दाखवतो, असा सज्जड दम पोलिसांनी दिला होता मात्र तरीही दहशत कमी होताना दिसत नाही आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune News : राज्यात लवकरच पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांची आदला बदल होणार? अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार?; सुत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget